Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० मार्च, २०२१, मार्च २०, २०२१ WIB
Last Updated 2021-03-20T16:47:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MPSC Exam: करोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेत राज्यभरात रविवारी परीक्षा Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी होणार असून, परीक्षेला सामोरे जाण्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचना 'एमपीएससी'ने जाहीर केल्या आहेत. परीक्षार्थ्यांला सुरक्षित नियमांचे पालन करणे अनिवार्य असून, मास्क, सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोव्हज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना करोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील, तर त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 'एमपीएससी'ने करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोदणी केली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परीक्षा दोन सत्रात होणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करता यावे म्हणून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना एमपीएससीकडून तीन पदरी मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहेत. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेउन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. लक्षणे असणाऱ्या उमेदवारांना फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल कॅप आदी साहित्य असलेले पीपीई कीट पुरविण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रामध्ये लावण्यात आलेले सूचनाफलकांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक राहील. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. त्याचप्रमाणे उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. परीक्षा संपल्यानंतर वापरण्यात आलेले मास्क, सॅनिटायझर, कीट आदी साहित्य केंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत, अशा सूचनांचा समावेश आहे. परीक्षेबाबत अधिक माहिती एमपीएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tJHVZt
via nmkadda