Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ मार्च, २०२१, मार्च २२, २०२१ WIB
Last Updated 2021-03-21T18:47:53Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MPSC EXAM: मराठा आरक्षणासाठी ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांचे आंदोलन Rojgar News

Advertisement
अहमदनगर: कडे लक्ष वेधण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी एमपीएससीची परीक्षा काळ्या फिती बांधून जमिनीवर बसून देण्यात आली. स्मायलिंग अस्मिताने विद्यार्थी संघटनेने हे आंदोलन केले. रविवारी राज्यात एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा देशभर गाजत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे स्मायलिंग अस्मिताचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार मराठा आरक्षणावर निर्णायक भूमिका घेताना दिसत नाहीत. या सर्वांचा निषेध म्हणून आज राज्यात विविध ठिकाणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी परीक्षा बेंचवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून आणि काळ्या फिती बांधून पेपर सोडविले. परीक्षेदरम्यान काही ठिकाणी विद्यार्थ्यी कार्यकर्त्यांना जमिनीवर बसण्यास परिवेक्षक तथा परीक्षा नियंत्रकांनी विरोध केला. त्यामुळे परीक्षा महत्त्वाची असल्याकारणाने परीक्षार्थींनी काळ्या फितीवरच समाधान मानत आंदोलन केले. यापुढील सर्वच परीक्षा अशाच प्रकारे देणार असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारने मराठा आरक्षणावर लोकसभा आणि राज्यसभेत तत्काळ अध्यादेश पारीत करून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करावा, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणी आंदोलनात सहभागी मराठा विद्यार्थ्यांनी केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c6MJBU
via nmkadda