CBSE 12th Exam 2021: कधी होणार बारावी परीक्षा? कोणत्या राज्याची काय भूमिका? Rojgar News

CBSE 12th Exam 2021: कधी होणार बारावी परीक्षा? कोणत्या राज्याची काय भूमिका? Rojgar News

सीबीएसईच्या बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा अद्याप न झाल्याने विद्यार्थी द्विधा अवस्थेत आहेत. विविध राज्य सरकारांची या परीक्षांच्या आयोजनाबाबत वेगवेगळी भूमिका आहे. केंद्राने बुधवारी राज्यांकडून या प्रश्नी सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार, ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी २९ राज्ये बोर्ड परीक्षा आयोजित केल्या जाण्याच्या बाजूने आहेत, तर दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि अंदमान व निकोबारने करोना महामारी दरम्यान सद्यस्थितीत बोर्ड परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. ऑब्जेक्टिव पॅटर्नने परीक्षा घेण्याची शिफारस यापूर्वी २३ मे रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बारावी परीक्षेत ( 12 Exam) यंदा केवळ प्रमुख विषयांचीच परीक्षा घेतली जावी अशी सूचना समोर आली. सीबीएसई बोर्डाचे बारावीचे १९ प्रमुख विषय आहेत. परीक्षा घेण्यासंबंधी दोन प्रस्ताव ठेवण्यात आले. बोर्डाने म्हटले की या परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि कमी अवधीच्या हव्यात. परीक्षांचा कालावधी घटवून ९० मिनिटांपर्यंत करण्याची शिफारस होती. दूसरा पर्याय शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा होता. १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान होऊ शकते परीक्षा वृत्तानुसार, सीबीएसईने १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान बारावी बोर्ड परीक्षा (CBSE 12th Exam date) आयोजित करण्याचा आणि निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यंदा सीबीएसई 12वीसाठी १४ लाख ३० हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यांकडून मिळालेल्या सूचना आणि शिफारसींच्या आधारे केंद्र सरकारच्या सल्लाने सीबीएसई लवकरच बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा करू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fp2mqj
via nmkadda

0 Response to "CBSE 12th Exam 2021: कधी होणार बारावी परीक्षा? कोणत्या राज्याची काय भूमिका? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel