CBSE, ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे ११वी प्रवेश कसे होणार? Rojgar News

CBSE, ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे ११वी प्रवेश कसे होणार? Rojgar News

FYJC Online Admission 2021: करोना परिस्थितीमुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर ११वीच्या प्रवेशाचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र बोर्डाने यावर तोडगा काढला. सामायिक परीक्षा म्हणजेच देणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर सीईटी न दिलेल्यांना संधी मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या निर्णयानंतर आता सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न या बोर्डांच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात उद्भवत आहे. महाराष्ट्र बोर्डाने ११ वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इतर बोर्डातील विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील सीईटीद्वारे होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे लक्षात घ्यायला हवे की कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सीबीएसई, आयसीएसई या अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना देखील वैकल्पिक सीईटी किंवा मग त्यांच्या निकालावर आधारित रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. कसा लागणार सीबीएसई दहावीचा निकाल? दरम्यान दहावी परीक्षा रद्द केल्याचे याआधीच सीबीएसई बोर्डाने जाहीर केले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशावेळी दोन बोर्डांमधील गुणांचे अंतर वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान सीबीएसई दहावी बोर्डाने मूल्यांकनाबाबतचे निकष जारी केले आहेत. यानुसार प्रत्येक शाळेत निकाल समिती नेमण्यात येत आहे. शाळेचे प्राचार्य आणि एकूण सात शिक्षक या समितीत आहे. सात शिक्षकांमध्ये पाच शिक्षक हे शाळेतील तर दोन शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील आहेत. मूल्यपमान पूर्ण करून सीबीएसई बोर्डातर्फे २० जून पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेश यासंदर्भात सीबीएसई बोर्डाने सुत्र तयार केल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये असताना पार पडलेल्या शालेय परीक्षा तसेच, दहावीत पार पडलेल्या शालेय परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेऊन देखील अंतिम निकाल जाहीर करणार असल्याचे समजते. दुसरीकडे आयसीएसई बोर्डाने देखील() दहावीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'देशात कोविड-19 ची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने बोर्ड दहावीची परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच आता दहावीच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडे यावर्षी परीक्षा देण्याचा पर्याय नसेल. विना परीक्षा निकाल तयार करण्यासाठी एक निष्पक्ष व उचित मानदंड तयार करेल. निकालाची तारीख नंतर सांगण्यात येईल आयसीएसई बोर्डाने आपल्या ताज्या परिपत्रकात म्हटले. शैक्षणिक सत्र 2021-22 साठी इयत्ता ११ वी प्रवेशांची प्रक्रिया सुरू करावी असा सल्ला आयसीएसई शाळांना देण्यात आलाय. सोबतच शाळांना लवकरात लवकर ११ वी ऑनलाइनच्या वर्गांचे वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना आयएससी २०२३ चा सिलॅबस (ICSE Board ISC syllabus) फॉलो करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्यासह देशभरात अकरावी प्रवेशासाठी चुरस सुरु होते. महाराष्ट्र, सीबीएसई, आयसीएसईसह अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांमधील प्रवेशाची चढाओढ आपल्याला पाहायला मिळते. पण यंदा दहावी परीक्षाच रद्द करण्याच्या निर्णयानंतर शैक्षणिक बोर्ड याला कसे सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Trtdt9
via nmkadda

0 Response to "CBSE, ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे ११वी प्रवेश कसे होणार? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel