ICMAI CMA June Exam 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

ICMAI CMA June Exam 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

June Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) ने फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांसाठी CMA 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. जे उमेदवार CMA 2021 परीक्षा देऊ इच्छितात, त्यानी आता विना विलंब शुल्क संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icmai.in वर ३० मे पर्यंत अर्ज जमा करता येणार आहेत. अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे की, 'कोविड-१९ च्या संक्रमणामुळे निर्णय झालेल्या महामारी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांना हे सूचित केले जाते की फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख विना विलंब शुल्कासह ३० मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.' ने फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेसाठी वेळापत्रक देखील जारी केलं आहे. वेळापत्रकानुसार, फाउंडेशन कोर्सची परीक्षा २३ जुलै २०२१ रोजी होईल. तर इंटरमीडिएट आणि फायनल कोर्सची परीक्षा २६ जुलै रोजी सुरू होऊन २ ऑगस्ट २०२१ रोजी संपणार आहे. अशा भरा परीक्षा अर्ज - - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट वर जा आणि आपला ईमेल आईडी आणि वैयक्तिक तपशील रजिस्टर करा.करें. - जेव्हा तुम्ही आयडी आणि पासवर्ड जनरेट होईल तेव्हा पुन्हा वेबसाइटवर जा आणि आपला नवा रजिस्ट्रेशन नंबर भरून “Click Here” बटणावर क्लिक करा. - आता तुमची आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. - आपले छायाचित्र आणि स्वाक्षरी .jpg, .jpeg किंवा .bmp फॉरमॅटमध्ये अपलोड करा. - आता अॅप्लिकेशन फी भरण्यासाठी पेमेंट मोड सिलेक्ट करा. ICMAI ने कळवले आहे की अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तीन दिवसांनी आपल्या अॅप्लिकेशनचे स्टेटस तपासा. जर पेमेंट केल्यानंतरदेखील अर्जाची स्थिती अपूर्ण असल्याचे दाखवत असेल तर पेमेंटचे चालान पुराव्यानिशी exam.helpdesk@icmai.in वर ईमेल करा. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u8vNkc
via nmkadda

0 Response to "ICMAI CMA June Exam 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel