NCHM JEE 2021: परीक्षा लांबणीवर पडल्याने अर्जांसाठी मुदतवाढ Rojgar News

NCHM JEE 2021: परीक्षा लांबणीवर पडल्याने अर्जांसाठी मुदतवाढ Rojgar News

Registration & Exam pattern: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (NCHM JEE) 2021 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही, ते आता २० जून २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी, रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत ३१ मे पर्यंत होती. उमेदवार NCHM JEE चे अद्ययावत नोटिफिकेशन एनसीएचएमचे अधिकृत संकेतस्थळ nchmjee.nta.nic.in वर जाऊन तपासू शकता. या व्यतिरिक्त या वृत्ताच्या अखेरीस देखील नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक देण्यात आली आहे. NCHM JEE 2021 परीक्षा स्थगित एनटीएने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार, १२ जून रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे आणि सुधारित तारखांची घोषणा यथावकाश केली जाईल. COVID-19 मुळे उमेदवारांच्या अडचणी पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तारखा ऑनलाइन परीक्षा अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत: २० जून, २०२१ परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत: २० जून, २०२१ करेक्शन विंडो उघडण्याची तारीख: २१ जून ते ३० जून २०२१ अर्जाची पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी किंवा समकक्ष उत्तीर्ण उमेदवार एनसीएचएमसीटी जेईई 2021 साठी अर्ज करू शकतात. NCHMCT JEE काय आहे? एनसीएचएमसीटी जेईई 2021 नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएम अँड सीटी) शी संलग्न देशातील विविध इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) मध्ये बीएससी (HHM) शैक्षणिक वर्ष 2021-22 अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा आहे. परीक्षेचा पॅटर्न एनटीएमार्फत तीन तासांची एक संगणकीकृत परीक्षा (CBT) एनसीएचएम जेईई-2021 आयोजित केली जाते. या परीक्षेत ८०० गुणांची प्रश्नपत्रिका असते. यात न्यूमरिकल अॅबिलिटी आणि अॅनालिटिकल अॅप्टिट्यूड (३० प्रश्न), सामान्य ज्ञान आणि ताज्या घडामोडी (३० प्रश्न), रीजनिंग आणि लॉजिकल डिडक्शन (३० प्रश्न), इंग्रजी भाषा (६० प्रश्न), आणि सेवा क्षेत्रातील योग्यता (५० प्रश्न) आदी विषयांचे मल्टीपल चॉइस क्वेश्चन (MCQs) या परीक्षेत विचारले जातात. प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजी आणि हिंदीत असेल. प्रत्येक प्रश्न चार गुणांचा असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uwNtGw
via nmkadda

0 Response to "NCHM JEE 2021: परीक्षा लांबणीवर पडल्याने अर्जांसाठी मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel