NTPC Jobs 2021: इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती, १.४० लाखांपर्यंत वेतन Rojgar News

NTPC Jobs 2021: इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती, १.४० लाखांपर्यंत वेतन Rojgar News

NTPC Engineer Vacancy 2021: जर तुम्ही इंजिनीअरिंगमधील शिक्षण घेतलं आहे तर भारत सरकारची महारत्न कंपनी (Maharatna Company) एनटीपीसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन (NTPC) ने विविध विभागातील इंजिनीअरिंग करणाऱ्यांसाठी शेकडो रिक्त पदे भरायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी, ऑनलाइन परीक्षा होणार नाही. ची अर्ज प्रक्रिया, अधिकृत जॉब नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. पदाचे नाव - इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (NTPC Engineering Executive Trainee) पदांची संख्या - २८० स्ट्रीम्स - इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रूमेंटेशन पे स्केल - ४० हजार ते १.४० लाख रुपये मासिक पर्यंत (हा बेसिक पे आहे. संपूर्ण वेतन अन्य भत्त्यांसह मिळेल.) कसा करायचा अर्ज एनटीपीसी करियर (NTPC Career) ची वेबसाइट ntpccareers.net वर जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म (NTPC EET application form) भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जून २०२१ आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अॅप्लिकेशन फी ३०० रुपये आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज प्रक्रिया मोफत आहे. इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात. पात्रता (Eligibility) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग मध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक. गेट स्कोर (GATE score) देखील मागवण्यात आला आहे. वयोमर्यादा कमाल वय वर्ष २७ हवे. आरक्षित प्रवर्गांमधील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. निवड प्रक्रिया एज्युकेशनल मेरिट आणि गेट स्कोरच्या आधारे निवड करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QH8TD7
via nmkadda

0 Response to "NTPC Jobs 2021: इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती, १.४० लाखांपर्यंत वेतन Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel