बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशिवायचा मार्ग तपासून पाहावा: वर्षा गायकवाड Rojgar News

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशिवायचा मार्ग तपासून पाहावा: वर्षा गायकवाड Rojgar News

आगामी काळातले करोना महामारीचे संकट आणि तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशिवायचा मार्ग तपासून पाहावा, असे मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी पार पडलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीत मांडले. मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही आपली प्राथमिकता असायला हवी. विद्यार्थी, पालक कोविड महामारी काळात बोर्ड परीक्षांना बसण्यासंबंधीची चिंता, भीती सातत्याने व्यक्त करत आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन रेट्रोअॅक्टिव्ह असेसमेंट मॉडेलवर करणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगत असल्याचेही गायकवाड यांनी केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. सीबीएसई बोर्डाच्या शाळांसाठी केंद्र सरकारने बैठकीत दोन पर्याय समोर ठेवले आणि त्यावर राज्यांकडून अभिप्राय मागितले. मी प्राथमिक पातळीवर अभिप्राय नोंदवला मात्र सीबीएसई आणि राज्यातील बोर्ड परीक्षांसंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी आणि विधी तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले. काउन्सिल ऑफ बोर्ड्स ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया (COBSE) ने या आव्हानात्मक काळात एकदा भेटण्याचीही तसदी घेतली नाही, हे दुर्दैवी आहे, असं मतही वर्षा गायकवाड यांनी नोंदवलं. COBSE च्या नियमित बैठका व्हायला हव्यात, असे त्यांनी सुचवले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wrqmP4
via nmkadda

0 Response to "बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशिवायचा मार्ग तपासून पाहावा: वर्षा गायकवाड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel