'दहावीच्या परीक्षेचे नियोजन शाळास्तरावर शक्य' Rojgar News

'दहावीच्या परीक्षेचे नियोजन शाळास्तरावर शक्य' Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे एका वर्गात प्रत्येकी पाच विद्यार्थी याप्रमाणे दहावीची परीक्षा दोन सत्रांत शाळास्तरावर घेता येईल. या पद्धतीने पंधरा दिवसांत परीक्षा संपून, पंधरा दिवसांत शाळास्तरावर मूल्यांकन होऊन निकाल लागतील, अशा प्रकारचे दहावीच्या परीक्षेचे नियोजन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मांडण्यात आले आहे. राज्य सरकारच्या इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 'कुलकर्णी यांनी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सकारात्मक वातावरणात परीक्षा शक्य असून, त्याचे नियोजन शाळास्तरावर योग्य पद्धतीने होईल,' अशी भूमिका मांडली आहे. याबाबतचे सविस्तर पत्र त्यांनी गायकवाड यांना लिहून परीक्षेच्या आयोजनाचा पर्याय दिला आहे. 'परीक्षा केंद्रांवर मास्क, सॅनिटायझर यांचा वापर अनिवार्य करण्यात येऊन सर्व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून घ्यावी. त्याचप्रमाणे खासगी वाहन वापरण्याची परवानगी घ्यावी,' असेही कुलकर्णी यांनी नियोजनात म्हटले आहे. शाळास्तरावर १५ दिवसांत मूल्यांकन 'प्रत्येक वर्गात पाच विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षा घेतल्यास, एका सत्राच्या वेळी शाळेत किमान ४१, तर कमाल २२६ जण उपस्थित असतील. या प्रकारे साधारण १५ दिवस परीक्षा चालेल. त्यानंतर पुढील १५ दिवसांत शाळास्तरावर इतर शाळेतील शिक्षकांकडून उत्तपत्रिकेचे मूल्यांकन करण्यात यावे. त्यामुळे निकाल लवकर जाहीर होऊन १६ ऑगस्टच्या पुढे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल,' असेही धनंजय कुलकर्णी यांनी सुचविले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RGlozp
via nmkadda

0 Response to "'दहावीच्या परीक्षेचे नियोजन शाळास्तरावर शक्य' Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel