सेट परीक्षेच्या शुल्कात सवलत देण्याची मागणी Rojgar News

सेट परीक्षेच्या शुल्कात सवलत देण्याची मागणी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेला अर्ज करण्यासाठीच्या शुल्कात गेल्या वर्षी वाढ केली होती. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेसाठी अर्ज भरण्यात आर्थिक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन 'सेट'साठी शुल्कात सवलत देण्यात यावी; अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी घेतली जाते. येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेचे अर्ज विद्यापीठाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने भरायला १७ मेपासून सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी शुल्कवाढ करताना खुल्या गटासाठीचे सहाशे रुपये शुल्क आठशे रुपये करण्यात आले, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे ४५० रुपयांचे शुल्क ६५० करण्यात आले होते. त्यामुळे यंदा शुल्कात सवलत देण्याची मागणी होत आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी शुल्कवाढ केली असली, तरी करोनाकाळात पालक आणि विद्यार्थ्यांपुढे आर्थिक अडचणी आहेत. या परिस्थितीत विद्यापीठाने शुल्कात सवलत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी 'स्टुडंट हेल्पिंग हँड'चे कुलदीप आंबेकर यांनी केली आहे. 'करोना प्रादुर्भावामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी संघर्ष सुरू असताना सेट परीक्षांची शुल्कवाढ परवडणारी नाही. त्यामुळे विद्यापीठाने शुल्कात सवलत द्यावी. याबाबत निर्णय मागे न घेतल्यास आक्रमक आंदोलन करू,' असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. 'इतरांच्या तुलनेत शुल्क कमीच' 'सेट परीक्षेच्या शुल्कासंदर्भात समिती नेमली होती. समितीच्या शिफारसीनुसार साधारण १२ वर्षांनी शुल्कवाढ करण्यात आली. त्या शुल्कानुसार एक परीक्षाही झाली. गेल्या वर्षी परीक्षेसाठी आकारलेले शुल्क यंदा कायम आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. इतर राज्यांतील सेट परीक्षा शुल्काच्या तुलनेत राज्यातील परीक्षेचे शुल्क निम्मे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि संघटनांनी विद्यापीठाच्या बाजूचाही विचार करणे गरजेचे आहे,' असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fyqrK5
via nmkadda

0 Response to "सेट परीक्षेच्या शुल्कात सवलत देण्याची मागणी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel