'दूरदर्शन' ठरणार ऑनलाइन शिक्षणाचा दुवा Rojgar News

'दूरदर्शन' ठरणार ऑनलाइन शिक्षणाचा दुवा Rojgar News

पुणे : गेल्या वर्षी युट्युब, व्हॉट्सअॅप आणि वेगवेगळ्या अॅप्लिकेशनद्वारे दिल्या गेलेल्या ऑनलाइन शिक्षणासाठी आता वर्षभर ''ची मदत घेतली जाणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात 'दूरदर्शन'वर ऑनलाइन शिक्षणासंदर्भातील सर्वाधिक कार्यक्रम आणि उपक्रम घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्याच्या सर्व भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम पोहोचविण्यासाठी दूरदर्शनचा उपयोग केला जाणार असून, विद्यार्थ्यांचे इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्याचा उद्देश असल्याचेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे जूनमध्ये शाळा प्रत्यक्ष स्वरूपात सुरू होणार नसून, ऑनलाइन माध्यमाद्वारे यंदाही शाळांचा श्रीगणेशा होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. गेल्या वर्षी राज्याच्या शिक्षण विभागाने युट्युब, व्हॉट्सअॅप अशा इंटरनेटवरील समाजमाध्यमांचा वापर करून, ऑनलाइन शिक्षणाचे उपक्रम राबवले होते. 'दूरदर्शन'चाही तेव्हा वापर करण्यात आला होता. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प होते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाइलसारख्या गॅजेटच्या उपलब्धतेचा प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण होतो, हे लक्षात आल्यानंतर यंदा मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी प्रामुख्याने 'दूरदर्शन' वापरण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाने 'दूरदर्शन'कडून अतिरिक्त स्लॉट (प्रसारणाच्या वेळा) निश्चित करून घेतले आहेत. या वेळांचा वापर करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विषय शिकवले जाणार आहेत. विशेष कोर्सची निर्मिती येत्या वर्षभरात ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातील मुद्दे समजणार नाहीत किंवा जे विद्यार्थी मागे पडतील, अशा विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कोर्सची निर्मिती केली जात असून, या विद्यार्थ्यांना या कोर्समार्फत इतर विद्यार्थ्यांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. यंदा कोणीही विद्यार्थी कोणत्याही प्रकारे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विभागाचे प्रयत्न असून, हा कोर्स त्यातील एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे. स्वाध्यायावरही भर देणार शिक्षण विभाग गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही प्रत्येक विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका तयार करणार असून विद्यार्थ्यांकडून त्या सोडवून घेण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षक आणि पालकांवर सोपवली जाणार आहे. ऑनलाइन माध्यमातून, शाळेतील शिक्षकांच्या आधारे जे शिकवले जाईल, त्याची उजळणी स्वाध्याय पुस्तिकांमार्फत केली जाणार असल्याने या उपक्रमावरही अधिक भर दिला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑनलाइन शिक्षणाच्या पद्धतींमध्ये अनेक बदल केले आहेत. सगळ्यांनाच इंटरनेट आणि स्मार्टफोन उपलब्ध होणे शक्य नसल्याने यंदा अधिकाधिक अभ्यासक्रम 'दूरदर्शन'द्वारे शिकवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी'दूरदर्शन'नेही अतिरिक्त वेळ दिली आहे. या वेळांचा वापर करून राज्यातील शिक्षक विविध विषयांचा आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील. - दिनकर टेमकर, संचालक, शिक्षण विभाग


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uB4uzo
via nmkadda

0 Response to "'दूरदर्शन' ठरणार ऑनलाइन शिक्षणाचा दुवा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel