वैद्यकीय परीक्षांच्या तयारीला लागा; मंत्र्यांचे आवाहन Rojgar News

वैद्यकीय परीक्षांच्या तयारीला लागा; मंत्र्यांचे आवाहन Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या कारणामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे अथवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही. तसेच न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षांना सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी केले. परीक्षार्थींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले आहे. राज्यात करोनाचा प्रकोप सुरू असल्यामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. त्याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वरील स्पष्टीकरण केलेले आहे. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर १ जूनपर्यंत लॉकडाउनचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे २ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जूनपासून घेण्याचे निश्चित केले आहे. करोना प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे. असे असताना या परीक्षा रद्द कराव्यात, पुढे ढकलाव्यात अथवा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थ्यांची आहे. वास्तविक मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करणे अथवा ऑनलाईन घेणे संयुक्तिक ठरत नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे. गतवर्षी करोनाचे संकट असताना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. परीक्षा अनिवार्य मेडिकलच्या परीक्षांबाबत केंद्रीय नियामक मंडळाचे काही कडक नियम आहेत. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरत आहे. यामुळे मेडिकलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे त्यांच्या हिताचे ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही यासंदर्भात विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे. परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u4pYo8
via nmkadda

0 Response to "वैद्यकीय परीक्षांच्या तयारीला लागा; मंत्र्यांचे आवाहन Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel