'व्यावसायिक अभ्यासक्रमांची मान्यता तपासून प्रवेश घ्या' Rojgar News

'व्यावसायिक अभ्यासक्रमांची मान्यता तपासून प्रवेश घ्या' Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'राज्यात व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी शिखर संस्थांची आणि राज्य सरकारच्या मान्यता असलेल्या विद्यापीठ, संस्थेत प्रवेश घ्यावा. अनधिकृत संस्थेत प्रवेश घेऊ नका,' असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे. अनधिकृत संस्थांच्या तक्रारी डीटीईकडे आल्यानंतर, या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, प्लॅनिंग, बी.व्होक या पदवी; तसेच एमबीए, एमसीए, एम.फार्मसी, एमई/एमटेक, एमआर्क यांसह अन्य पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यातील अभ्यासक्रमांना विद्याशाखेप्रमाणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या शिखर संस्थांची; तसेच राज्य सरकारची मान्यता असणे आवश्यक आहे. डीटीईच्या अधिकृत वेबसाइटवर अभ्यासक्रमाची यादी व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासक्रमांची मान्यता तपासा राज्यातील काही संस्था विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून संस्था मान्यताप्राप्त आहे; तसेच शिखर संस्थांची मान्यता आहे, असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात. त्यानंतर नोकरीच्या किंवा उच्चशिक्षणाच्या संधींबाबत अर्ज करताना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. अशा प्रकारच्या तक्रारी संचालनालयाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, 'कोणत्याही अनधिकृत संस्थेच्या अथवा विद्यापीठाच्या भूलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमांची मान्यता तपासून घ्यावी. त्यानंतरच प्रवेश घ्यावा,' असे आवाहन डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oJjWbr
via nmkadda

0 Response to "'व्यावसायिक अभ्यासक्रमांची मान्यता तपासून प्रवेश घ्या' Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel