'या' विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचं शिक्षण मोफत?; शिक्षणमंत्र्यांची घोषणा Rojgar News

'या' विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचं शिक्षण मोफत?; शिक्षणमंत्र्यांची घोषणा Rojgar News

Affected Student's Education: महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Education Dept) करोनाग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे की या मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ज्या मुलांनी करोनामुळे (Corona Virus) त्यांचे आई-वडिल गमावले आहेत, अशा मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले की कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारतर्फे उचलण्यात येणार आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग करेल. हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. गायकवाड यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की 'करोनामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले. पालकांचा आधार न राहिल्याने त्यांच्यासमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न उभा आहे. सदर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत व पुढील शिक्षणाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे.' दरम्यान, महाराष्ट्राच्या आधी केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड आदी राज्यांनीही यासंदर्भातील घोषणा केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uvu2xI
via nmkadda

0 Response to "'या' विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचं शिक्षण मोफत?; शिक्षणमंत्र्यांची घोषणा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel