Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २२ मे, २०२१, मे २२, २०२१ WIB
Last Updated 2021-05-22T07:47:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

गुजरातमध्ये १० लाखांहून अधिक विद्यापीठ विद्यार्थी परीक्षेविना पास Rojgar News

Advertisement
University and College Exams 2021: देशभरात करोनाची दुसरी लाट (Covid 19 second wave) ओसरायचे नाव घेत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक राज्यांतील शाळा आणि बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता यूनिवर्सिटी आणि कॉलेज परीक्षा देखील रद्द होत आहेत. गुजरात सरकार (Gujarat Govt) ने सध्याच्या करोना परिस्थितीमुळे राज्यातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांना विना परीक्षा प्रमोट करून वरच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी शुक्रवारी २१ मे रोजी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. त्यांनी सर्व शासकीय आणि खासगी महाविद्यालये आणि विद्यापीठांना दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा प्रमोट करण्याचे निर्देश दिले आहेत. या विद्यार्थ्यांना मागील परीक्षांमधील मेरिटच्या आधारे प्रमोट केले जाणार आहे. गुजरातमधील ९.५० लाखांहून अधिक यूजी विद्यार्थ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे. मात्र हा निर्णय वैद्यकीय (Medical Courses) आणि निमवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी (Para Medical) लागू नसेल. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. यापूर्वी गुजरातमध्ये नववी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा प्रमोट करत वरचा वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात बोर्डाने (Gujarat Board) नववी, दहावी आणि अकरावीतल्या विद्यार्थ्यांना दहा गुणांपर्यंत ग्रेस गुण देण्याचा अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे. मात्र त्यांच्या मार्कशीट वर 'कोविड-19 मुळे परीक्षा झाल्या नाहीत' असे लिहिलेले असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f7427s
via nmkadda