Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २४ मे, २०२१, मे २४, २०२१ WIB
Last Updated 2021-05-24T13:47:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावीसाठी छत्तीसगडचा नवा पॅटर्न; विद्यार्थी घरी घेऊन जाणार प्रश्नपत्रिका Rojgar News

Advertisement
CGBSE class 12 board exam 2021: करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अद्याप जेथे सीबीएसई (CBSE) सह अन्य राज्य मंडळे कोणत्याही निर्णयाप्रत आलेली नाहीत, मात्र छत्तीसगड बोर्डाने ( Board) परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा देखील केली. इतकेच नव्हे तर छत्तीसगडने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परीक्षा देता येईल, असा नवा मार्गही शोधून काढला! छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळ (CGBSE) बारावीच्या बोर्ड परीक्षा १ जून २०२१ पासून आयोजित करणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, ही परीक्षा अवघी पाच दिवसात संपणार आहे. १ ते ५ जून २०२१ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. कशी होणार बारावी बोर्ड परीक्षा? (How 12th board exam will be conducted) परीक्षा ऑफलाइन म्हणजेच पेन-पेपर मोड वर होणार आहे. मात्र विद्यार्थी घर बसल्या परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी संबंधित केंद्रावर जाऊन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका घ्यायच्या आहेत. सर्व विषयांचे पेपर एकत्रच देण्यात येणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना ५ जून पर्यंत घरबसल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बोर्डाने दिलेल्या उत्तरपत्रिकेत लिहायची आहेत आणि नंतर ६ जून रोजी सर्व उत्तरपत्रिका त्या परीक्षा केंद्रावर जमा करायच्या आहेत. बोर्डाने निर्देश दिले आहेत की उत्तरपत्रिका ऑनलाइन, स्पीड पोस्ट किंवा कुरियरद्वारे जमा करता येणार नाहीत. त्या दिलेल्या वेळत परीक्षा केंद्रावर जमा करायच्या आहेत. जर कोणी विद्यार्थी दिलेल्या तारखेत उत्तरपत्रिका जमा करणार नसेल, तर त्याला अनुपस्थित घोषित करण्यात येईल. उत्तरपत्रिका जमा करताना विद्यार्थ्यांना हजेरी देखील लावायची आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3upcd3H
via nmkadda