कोव्हिडविरोधात भावी डॉक्टर मैदानात... Rojgar News

कोव्हिडविरोधात भावी डॉक्टर मैदानात... Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून विविध आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेले नऊ हजार ७६८ विद्यार्थी सध्या कोव्हिड काळात रुग्णसेवा करीत आहेत. शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर इंटर्नशिपदरम्यान हे विद्यार्थी ही सेवा देत असल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी शिक्षणाचे शेवटचे वर्ष पूर्ण केल्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. गेल्या वर्षापासून जगावर आलेले कोव्हिडचे संकट लक्षात घेता आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. या काळात कोव्हिड रुग्णांची सेवा करण्यासाठी आरोग्यसेवकांची मोठी गरज निर्माण झाली होती. यादरम्यान गेल्या वर्षभरात विविध आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण केलेले नऊ हजार ७६८ विद्यार्थी इंटर्नशिपदरम्यान कोव्हिड रुग्णांना सेवा देत आहेत. एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यासोबतच नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट रुग्णालयांमध्ये सेवेत रुजू करून घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. विद्यापीठामार्फत गेल्या वर्षी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी, पॅरामेडिकल स्टाफ व अधिकाऱ्यांना 'कोव्हिड-१९'च्या जनजागृतीसाठी भारत सरकारने सुरू केलेल्या 'आयगॉट ट्रेनिंग कोर्सेस ऑन कोव्हिड-१९ पँडेमिक'वरून प्रशिक्षण देण्यात आले होते. यादरम्यान ३३ हजार ५५० व्यक्तींना हे प्रशिक्षण देण्यात आल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले. कोव्हिडदरम्यान घ्यावयाची काळजी, जनजागृती, तसेच अन्य मार्गदर्शक तत्त्वांवर हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिकारी- १ हजार ८५९ विद्यार्थी- १८ हजार ३८० डॉक्टर- ७ हजार ५०१ पॅरामेडिकल स्टाफ- ५ हजार ८१० कोव्हिडबाधितांच्या सेवेतील विद्यार्थी... एमबीबीएस- ४ हजार २५२ बीएएमएस- २ हजार ५५० बीएचएमएस- २ हजार ५२ बीयूएमएस- २५० नर्सिंग- ६६४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ytY9ZP
via nmkadda

0 Response to "कोव्हिडविरोधात भावी डॉक्टर मैदानात... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel