Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २९ मे, २०२१, मे २९, २०२१ WIB
Last Updated 2021-05-29T06:47:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

जुलै सेमिस्टर २०२१ ऑनलाईन शिकवण्याचे UGC चे निर्देश Rojgar News

Advertisement
Issues List of 123 : अनुदान आयोगाने (UGC) करोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतलाय. उच्च शिक्षण संस्था बंद ठेवून ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे अभ्यास सुरु ठेवण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. यूजीसीने जारी केलेल्या नोटीसनुसार, ऑनलाइन SWAYAM च्या माध्यमातून साधारण १२३ अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्याची सूचना देण्यात आली आहे. जुलै 2021 च्या सत्रात ८३ पदवीधर (यूजी) आणि 40 पदव्युत्तर (पीजी) नॉन-अभियांत्रिकी MOOCs असणार आहेत. करोना व्हायरस () साथीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतलाय. मोठ्या प्रमाणात खुल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे (एमओसीसी) शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूजी, पीजी कोर्सच्या यादीच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. १२३ यूजी, पीजी अभ्यासक्रमांची यादी जुलै ते ऑक्टोबर सेमिस्टर २०२१ साठी ८३ पदवीधर (यूजी) आणि ४० पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांची यादी SWAYAM च्या अधिकृत swayam.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यूजीसीचे पत्र यूजीसीने सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची सद्यस्थिती पाहता विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर SWAYAM च्या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच 'करोनामुळे उद्भवलेली परीस्थिती पाहता विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांमधील वेबसाइट आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून SWAYAM अभ्यासक्रमाची माहिती द्यावी,' असेही पुढे म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34qlD43
via nmkadda