Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ जून, २०२१, जून ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-06-07T11:47:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

2021 ने शिकवला धडा! Board Exams 2022 ची तयारी सुरू, 'अशा' होणार परीक्षा Rojgar News

Advertisement
10th 12th Board Exams 2022 Plan: करोना व्हायरस संक्रमण (Covid Second Wave) वाढल्यामुळे यंदा सीबीएसईसह अन्य बहुतांश राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करणार आहेत. पण या मार्किंग पद्धतीवर देखील आक्षेप घेतले जात आहेत. बहुतांश शाळांमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झालेच नाही. हा सर्व अनुभव गाठीशी असल्याने यावर्षी राज्य सरकारे आणि शाळाही सजग झाल्या आहेत. महामारी (Pandemic) च्या काळातील २०२० आणि २०२१ या वर्षांपासून धडा घेत आता २०२२ बोर्ड परीक्षांचे नियोजन अनेक शाळा, राज्ये आतापासूनच करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली सरकार नव्या परीक्षा पद्धतीवर विचार करत आहे. अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्रालाही पत्र पाठवले आहे. सीबीएसई बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर बोर्डाकडून अद्याप विद्यार्थ्यांच्या असेसमेंट आणि मार्किंग स्कीम (CBSE 12th Marking Scheme) बाबतचे धोरण अद्याप निश्चित व्हायचे आहे. यच दरम्यान, दिल्ली सरकारने (Delhi Govt) शैक्षणिक सत्र २०२१-२२ बोर्ड परीक्षांसाठी प्लानिंग सुरू केले आहे. यासंबधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया () यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाला देखील पत्र लिहिले आहे. मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कोणत्या पद्धतीने केले जाईल, त्याचे नियोजन सुरू करायला हवे. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र लिहून महिन्याभराच्या आत एक उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी केली आहे. जेणेकरून नव्या वर्षातील मूल्यांकन पद्धतीबाबतचा अंतिम निर्णय घेता येईल. दिल्ली सरकारच्या एका शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शाळांमध्ये मूल्यांकनाला अध्यापनाचा एक भाग बनवण्याची योजना आहे. संपूर्ण वर्षभर सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य एकमेव बोर्ड परीक्षेवर आधारलेले नसावे. याउलट बोर्डाच्या निकालात त्याच्या शाळेतील १३ वर्षांची झलक दिसायला हवी. यासाठी शिक्षक-मुख्याध्यापक मिळून या नव्या टिचींग स्ट्रॅटेजीवर काम करत आहेत. जेणेकरून यावर्षी जे परीक्षांच्या बाबतीत झाले त्याची पुनरावृत्ती व्हायला नको.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3is7dbZ
via nmkadda