Asia University Ranking 2021 List: रेकॉर्ड यादीत ६३ भारतीय विद्यापीठं, जाणून घ्या Rojgar News

Asia University Ranking 2021 List: रेकॉर्ड यादीत ६३ भारतीय विद्यापीठं, जाणून घ्या Rojgar News

Asia Ranking 2021 List: आशिया रॅंकींग (The Asia Ranking)२०२१ मध्ये टॉपच्या १०० रँकमध्ये अनेक भारतीय विद्यापीठांनी आपले स्थान निर्माण केले आहे. IISc बंगळुरु, IIT रोपड आणि IIT इंदूरने आशियाच्या टॉप १०० विद्यापीठांमध्ये रँकिंगमध्ये स्थान मिळविले आहे. मागच्या वर्षांप्रमाणे यंदा देखील एकाही भारतीय विद्यापीठाने टॉप १० मध्ये स्थान मिळविले नाही. इंडिया इंस्टीट्यूट ऑफ सायन्स (IISc)बंगळुरु या लिस्टमध्ये ३७ व्या स्थानावर आहे. चिनच्या सिंघुया यूनिवर्सिटीने आशिया विद्यापीठ २०२१ मध्ये पहिले स्थान मिळविले आहे. दुसर्‍या स्थानावर चीनचे पेकिंग विद्यापीठ आहे. तिसरे आणि पाचवे स्थान सिंगापूरच्या विद्यापीठांनी मिळविले आहे. तर हांगकांग विद्यापीठ चौथ्या स्थानी आहे. भारतीय विद्यापीठाचा रेकॉर्ड टाइम्स उच्च शिक्षण आशिया विद्यापीठ रॅंकिंग २०२१ मध्ये एकूण ६३ भारतीय विद्यापीठांनी स्थान मिळविले आहे. हा एक रेकॉर्ड आहे. यामध्ये ३ नवीन विद्यापीठ टॉप २०० मध्ये आहेत. जपानची ११६ आणि चीनची ९१ विद्यापीठे या यादीमध्ये समाविष्ट आहेत. टाइम्स उच्च शिक्षण आशिया विद्यापीठ रॅंकिंगमध्ये भारतीय आणि टॉप रॅंकिंगमधील विद्यापीठांची यादी पाहूया स्थान आणि विद्यापीठाचे नाव ३७: भारतीय विज्ञान संस्थान ५५: आयआयटी-रोपड़ ७८: आयआयटी-इंदूर १२२: रासायनिक प्रौद्योगिकी संस्थान १३७: आयआयटी-गांधीनगर १३९: किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठ १४२: आयएसईआर कोलकाता १४३: आयआयटी दिल्ली १४४: आयआयटी हैदराबाद १४४: थापर विद्यापीठ १५४: महात्मा गांधी विद्यापीठ १६९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १७०: अमृता विश्व विद्यापीठ १७२: बनारस विद्यापीठ १७५: पंजाब विद्यापीठ १८० : जामिया मिलिया विद्यापीठ १८७: जेएनयू १९९: आयएसईआर पुणे
  आशिया विद्यापीठ रॅंकिंग २०२१ तील टॉप संस्था १: सिंघुआ विद्यापीठ, चीन २: पेकिंग विद्यापीठ ३: नॅशनल विद्यापीठ, सिंगापूर ४: हांगकांग विद्यापीठ ५: नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ, सिंगापूर ६: टोकियो विद्यापीठ ७: हांगकांग चीनी विद्यापीठ ८: हांगकांग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ ९: सियोल राष्ट्रीय विद्यापीठ १०: क्योटो विद्यापीठ टाइम्स उच्च शिक्षण आशिया विद्यापीठांची रॅंकिंग तयार करण्यासाठी शिक्षण, संशोधन, आंतरराष्ट्रीय प्रतिमेसहित १३ वेगवेगळे मापदंड तयार केले गेले. दरम्यान मागची ७ वर्ष आयआयटी रॅंकींगमधील पारदर्शकता कमी असल्याचे सांगत रॅंकिंगवर बहिष्कार टाकण्यात आला होता.


  from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vNy0n2
  via nmkadda

  0 Response to "Asia University Ranking 2021 List: रेकॉर्ड यादीत ६३ भारतीय विद्यापीठं, जाणून घ्या Rojgar News"

  टिप्पणी पोस्ट करा

  Iklan Atas Artikel

  Iklan Tengah Artikel 1

  Iklan Tengah Artikel 2

  Iklan Bawah Artikel