Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ जून, २०२१, जून २५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-25T12:49:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

BOB Recruitment 2021: बॅंक ऑफ बडोदामध्ये 'या' पदासांठी भरती, असा करा अर्ज Rojgar News

Advertisement
BOB Recruitment 2021: बँक ऑफ बडोदा(BOB)ने विविध पदांवरील रिक्त जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. याअंतर्गत बिझनेस फायनान्स हेड, इंटरनल कंट्रोल आणि फायनान्स गव्हर्नंस हेड, इन्व्हेस्टर रिलेशन, डेप्यूटी हेड, इंटरनल कंट्रोल आणि फायनान्स गव्हर्नंस, फायनांशियल अकाऊंटींग, व्हाईस प्रेसिडेंट, बॅलेंस शिट प्लानिंग, व्हाईस प्रेसिडेंट - प्रोडक्ट प्रॉफिटॅबिलिटी सहित अन्य पदांवर भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर अर्ज करु शकतात. १५ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शैक्षणिक पात्रता बिझनेस फायनान्स हेड पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीएची पदवी असणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच बिझनेस फायनान्समध्ये ८ वर्षांचा अनुभव हवा. व्हाईस प्रेसिडेंट पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय फायनान्स विभागात एमबीएसहित संबंधित क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा हेड पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ वर्षे ते ४५ वर्षांदरम्यान असावे. तर व्हाईस प्रेसिडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकचे वय ३२ ते ४० वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. BOB Recruitment 2021:ऑनलाईन अर्ज करा बँक ऑफ बडोदामध्ये विविद पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँकेची वेबसाइट https://ift.tt/2z1D8rH वर जावे लागेल. त्यानंतर करियर पेजवर जावे लागेल. लिंकच्या माध्यमातून स्वत:ची ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यानंतर पदासाठी अर्ज करावा लागेल. शुल्क भरावे लागेल. अशी होईल निवड बँक ऑफ बडोदाच्या वतीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार विविध पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही थेट मुलाखत आणि ग्रुप डिस्कक्शनच्या आधारे केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SuPyGa
via nmkadda