Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २९ जून, २०२१, जून २९, २०२१ WIB
Last Updated 2021-06-29T08:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

BSF Jobs 2021: सीमा सुरक्षा दलात १७० पदांवर भरती प्रक्रिया Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (Border Security Force, BSF)मध्ये ग्रुप 'बी' आणि ग्रुप 'सी' पदांवर भरती निघाली आहे. बीएसएफच्या भरती प्रक्रियेंतर्गत एअर विंग, पॅरा मेडिकल आणि वेटरनरी स्टाफसाठी रिक्त पदांवर निवडीसाठी इच्छुक पुरुष आणि महिला विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट https://bsf.gov.in/Home वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत २६ जुलै २०२१ आहे. पदांची माहिती पॅरा मेडिकल स्टाफ: एसआय (स्टॉफ नर्स) ग्रुप बी पोस्ट- ३७ पदे एएसआय (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) ग्रुप-सी पोस्ट: १ पद एएसआय (लॅब टेक्निशियन) ग्रुप-सी पोस्ट: २८ पदे सीटी (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल) (ग्रुप-सी पोस्ट): ९ पदे वेटर्नरी स्टाफ एचसी (वेटर्नरी ) (ग्रुप-सी पोस्ट): २० पदे कॉन्स्टेबल (केनेलमन) (ग्रुप-सी पोस्ट): १५ पदे एयर विंग असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर)- ४९ पदे असिस्टंट रेडियो मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर)- ८ पदे कॉन्स्टेबल- ८ पदे ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना सर्वात आधी बीएसएफच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल आणि वन-टाइम प्रोफाइल भरून आपले रजिस्ट्रेशन करावे आणि विचारलेली पूर्ण माहिती भरावी. यानंतर अलीकडचे छायाचित्र, अंगठ्याचे निशाण अपलोड करावे लागेल. विविध पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षादरम्यान असावे. याव्यतिरिक्त आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी बीएसएफच्या अधिकृत पोर्टलवरील नोटिफिकेशन वाचावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y7qiEP
via nmkadda