Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ६ जून, २०२१, जून ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-06-06T12:47:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CA Exam 2021: चार्टर्ड अकाउंटंट्स परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
ICAI Schedule 2021:चार्टर्ड अकाऊंट कोर्सचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया(ICAI) ने सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीए फाउंडेशन (CA Foundation), सीए इंटर (CA Inter)आणि सीए फाइनल (CA Final)परीक्षेचे नवे वेळापत्रक आयसीएआयने आपली वेबसाइट icai.orgवर जाहीर केले आहे. सर्व सामान्या परिस्थितीत सीए फाउंडेशन परीक्षा जून २०२१ मध्ये घेण्यात येणार होती. सीए इंटर आणि फायनल परीक्षा मे २०२१ मध्ये होणार होती. करोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. आता या परीक्षा जुलै २०२१ मध्ये घेतल्या जाणार आहेत . कोणत्या कोर्सच्या परीक्षा कोणत्या तारखांना होणार याची यादी देण्यात आली आहे. केव्हा कोणती परीक्षा होणार ? सीए फाउंडेशन कोर्स २०२१ - २४,२६,२८ आणि ३० जुलै २०२१ सीए इंटर कोर्स ग्रुप १ (Old Scheme) - ६,८,१० आणि १२ जुलै २०२१ सी इंटर कोर्स ग्रुप २(Old Scheme) - १४,१६आणि १८ जुलै २०२१ सीए इंटर कोर्स ग्रुप १ (New Scheme) - ६,८,१० आणि १२ जुलै २०२१ सीए इंटर कोर्स ग्रुप २ (New Scheme) - १४,१६,१८ आणि २० जुलै २०२१ सीए फाइनल कोर्स ग्रुप १ (Old & New Scheme) - ५,७,९आणि ११ जुलै २०२१ सीए फाइनल कोर्स ग्रुप २ (Old & New Scheme) - १३,१५,१७आणि १९ जुलै २०२१ आयसीएआय जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार, सीए फाउंडेशन पेपर- ३ आणि ४ ही परीक्षा २ तासांची असेल. सीए फाइनल (न्यू स्कीम) पेपर - ६ परीक्षा ४ तासांची असेल. इतर सर्व परीक्षा ३ तासांच्या असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34VkEZY
via nmkadda