Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २८ जून, २०२१, जून २८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-28T10:47:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CA Exams 2021: सुप्रीम कोर्टात सुनावणीसंदर्भात काय झालं? जाणून घ्या Rojgar News

Advertisement
2021 latest updates: इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI) सीए परीक्षा २०२१ (CA Exam 2021) प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आयसीएआयला मंगळवारी उत्तर देण्यास सांगितले आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा ५ जुलैपासून सुरु होणार आहे. पण ठरलेल्या वेळापत्रक परीक्षा होणार की नाही हे सांगता येणार नाही. देशभरात हजारो उमेदवार परीक्षेत बदल करण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी ६००० उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लहिले आहे. यासंदर्भात आज (२८ जून२०२१) रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. तीन स्वतंत्र रिट याचिकेत याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला (ICAI) मंगळवार उत्तर देण्यास सांगितले. सीए विद्यार्थ्यांनी ((CA Students) सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत काही मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी - परीक्षा स्थगित केली जावी दुसरी मागणी - ओल्ड कोर्ससाठी सीए इंटर एग्जाम (CA Inter Exam)आणि सीए फाइनल एग्जाम (CA Final Exam)साठी एक अटेंप्ट दिला जावा. तिसरी मागणी - एग्झाम ऑप्ट आऊट करण्याचा पर्याय खुला ठेवावा. चौथी मागणी - परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली जावी. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असावे पाचवी मागणी - परीक्षेसाठी प्रवेश पत्राचा उपयोग ई-पास प्रमाणे केला जावा. आयसीएआय परीक्षा सेंटरपर्यंत पोहोचणाऱ्यांची प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था करावी. आयसीएआय मे २०२१ च्या सीए परीक्षेसाठी ऑप्ट आउट ऑप्शन देण्यात आला आहे. पण यात अनेक अटी आहेत. अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांन३ ऑप्ट आउट ऑप्शनचा पर्याय आणि जुलैच्या स्थानावर नोव्हेंबर 2021 च्या परीक्षेत समाविष्ट असू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ji3r5u
via nmkadda