CA Exams:'या' विद्यार्थ्यांना मिळाली ऑप्ट आऊटची संधी, ICAIची नोटीस Rojgar News

CA Exams:'या' विद्यार्थ्यांना मिळाली ऑप्ट आऊटची संधी, ICAIची नोटीस Rojgar News

CA Exam 2021:द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ((ICAI)ने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जुलै महिन्यात होणारी सीए परीक्षा(CA Exam) सोडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. या परीक्षांचे प्रवेश पत्र ((ICAI CA admit card) दिले गेले आहेत. तसेच उमेदवारांना परीक्षा देण्याचा पर्याय देखील देण्यात आलाय. आयसीएआयने सीए प्रवेश (CA Inter Exam)आणि अंतिम परीक्षा ( (CA Final Exam) ५ जुलै ते २० जुलै २०२१ पर्यंत घेण्याचे जाहीर केले आहे. सीए फाउंडेशन CA Foundation Exam)ची परीक्षा २४ जुलैला सुरु होणार असून ३० जुलैपर्यंत असेल. जे विद्यार्थी करोना पॉझिटीव्ह आहेत किंवा ज्यांच्या परिवारात कोणी करोनाशी लढतंय असे विद्यार्थी सीए जुलै २०२१ ही परीक्षा सोडू शकतात. या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. ज्यांची शेवटची संधी आहे त्यांना देखील नोव्हेंबर २०२१ ला परीक्षा देता येणार असल्याचे संस्थेने सांगितले. जो उमेदवार करोना पॉझिटीव्ह आहे किंवा ज्याचे पालक,आजीआजोबा किंवा नवरा-बायको, भाऊ-बहिण किंवा मुलांमध्ये कोणी पॉझिटीव्ह आहेत आणि ते जर एकत्र राहत असतील. तर अशा उमेदवारास ऑप्ट आऊट म्हणजे परीक्षा सोडण्याची सुविधा दिली जाईल. तुम्ही जर यापैकी कोणत्या प्रकारात येत असाल तर तुम्हाला करोनाचा आरटीपीसीआर रिपोर्ट (RT PCR Report) संस्थेकडे जमा करावा लागेल. करोना पॉझिटीव्ह व्यक्तीला आधार कार्डची झेरॉक्स देखील सबमिट करावी लागेल. आरटी पीसीआर रिपोर्ट हा आयसीएआयने ऑप्ट-आउटची घोषणा केल्यानंतर आणि परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीचा असावा. जर रिपोर्ट खोटा असेल तर उमेदवाराच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xLubPT
via nmkadda

0 Response to "CA Exams:'या' विद्यार्थ्यांना मिळाली ऑप्ट आऊटची संधी, ICAIची नोटीस Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel