TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CA परीक्षा घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ; ICAI चे सुप्रीम कोर्टात म्हणणे Rojgar News

on CA Exam July 2021: चार्टर्ड अकाउंटंट फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांच्या जुलै २०२१ मध्ये प्रस्तावित परीक्षांसंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवार ३० जून २०२१ पर्यंत लांबणीवर टाकली आहे. दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने परीक्षा स्थगित करण्यासंबंधी कोणतेही निर्देश दिले नाहीत. यासंबंधी बुधवारी अंतिम आदेश येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ही वेळच ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण कोविड-१९ संक्रमणाचे प्रमाण सध्या कमी आहे, असे आयसीएआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. अनुराधा बोस यांच्या खंडपीठाने मंगळवारी २९ जून रोजी सुनावणी घेतली. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ()सीए परीक्षांसंदर्भातील पाच पॉइंट नोट दाखल करण्याचे आदेश दिले. हे पाच मुद्दे कोणकोणते जाणून घ्या... - उमेदवारांना आरटीपीसीआर सर्टिफिकेटच्या अटीबाबत पर्याय द्या. - परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर एसओपीचे पालन होईल, याची काळजी घ्या आणि परीक्षा कक्ष विवाह सभागृहात नसावा. परीक्षेची विशिष्टता कायम राहावी, याची काळजी घ्या. - परीक्षेसाठी एक्झामिनर्स आणि इन्विजिलेटर्स यांनी आरटीपीसीआर चाचणी पूर्वीच केली असली पाहिजे. - जर अंतिम वेळेत कुठलं परीक्षा केंद्र नव्याने तयार झालं तर विद्यार्थ्यांना पर्यायी केंद्र निवडण्याचा किंवा ऑप्ट आऊटचा पर्याय मिळावा. -जर परीक्षेवेळी एखादा विद्यार्थी संक्रमित झाला तर त्याला परीक्षा चक्रात समाविष्ट होण्याची संधी मिळावी. सीए फाइनल आणि इंटरमीडिएट परीक्षा ५ ते २० जुलै या कालावधीत आणि फाउंडेशन परीक्षा २४ ते ३० जुलै २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. त्या स्थगित कराव्यात, अशी प्रमुख आणि अन्य मागण्यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी २९ जून २०२१ रोजी होणार होती. अनुभा श्रीवास्तव यांनी हि याचिका दाखल केली आहे. ICAI परीक्षा घेण्याच्या बाजूने यापूर्वी, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने जुलै २०२१ प्रस्तावित सीए फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांच्या परीक्षांसंबंधी सोमवारी २८ जून २०२१ रोजी सुप्रीम कोर्टात सांगितले की , सीए परीक्षांसाठा ३ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, यापैकी २ लाख ८० हजार उमेदवारांना परीक्षा द्यायची आहे. या उमेदवारांनी आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड केले आहेत. या उमेदवारांना ऑपट् आऊटचा पर्यायही देण्यात आला आहे. ते स्वत: संक्रमित असतील किंवा कुटुंबातील कोणी कोविड-१९ संक्रमित असेल तर अशा परिस्थितीत ते उमेदवार ऑप्ट आऊटचा पर्याय निवडू शकतील. दूसरीकडे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जुलै २०२१ च्या सीए परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑप्ट-आउट चा पर्याय यापूर्वीच दिला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hcgJ0G
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या