Career In ITI:असा करा आयटीआय कोर्स, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी Rojgar News

Career In ITI:असा करा आयटीआय कोर्स, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी Rojgar News

Career In ITI: इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (IIT) हा तुमच्या करियरसाठी उत्तर पर्याय असू शकतो. २ ते ६ वर्षांपर्यंत हा कोर्स करता येऊ शकतो.यानंतर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील सुरु करु शकता. यामध्ये दोन प्रकार आहेत. इंजिनिअरिंग ट्रेड (Engineering Trade)ज्यामध्ये ट्रेंड टेक्नॉलॉजी संबंधित विज्ञान आणि टेक्निकचे प्रशिक्षण दिले जाते. नॉन इंजिनिअरिंग ट्रेनिंग हा दुसरा प्रकार आहे. यामध्ये थोडी कमी टेक्निकल ट्रेनिंग असते. याचा अभ्यास करणारे ट्रेनिंगनंतर ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)देतात. आणि या टेस्टमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) दिले जाते. कोर्स आणि स्किल्सवर करिअर ठरेल तुम्ही कोणत्या प्रकारचा कोर्स करुन आयटीआय पूर्ण करताय आणि त्याला बाहेर किती मागणी आहे ? हे पाहणे महत्वाचे आहे. तुमचे कौशल्य आणि मेहनत देखील यामध्ये महत्वाची आहे. इथे तुम्हाला १०० हून अधिक कोर्स मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोर्स निवडू शकता. प्लंबर, टूल अॅण्ड डाय मेकर, कम्प्यूटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट आणि कारपेंटरसारखे कोर्स बेस्ट मानले जातात. असा मिळवा प्रवेश जुलैमध्ये आयटीआयचे प्रवेश सुरु होतात. आयटीआयची अधिकृत वेबसाइटवर तुम्ही ऑनलाइन नोंदणी करु शकता. सर्व प्रमाणपत्र पडताळणी झाल्यानंतर आयटीआयची मेरिट लिस्ट निघते. मेरिटनुसार तुम्हाला प्रवेश मिळेल. अनेक खासगी संस्थांमध्ये दहावीं आणि बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. तसेच सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. पात्रता आयटीआय कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून डिग्री असणे गरजेचे आहे. वयमर्यादा १४ वर्षांपेक्षा अधिक आणि २५ वर्षांपेक्षा कमी असावी. माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा, दिव्यांगांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. एसटी, ओबीसी यांना वयात ३ वर्षांची सवलत दिली आहे. कालावधी (Eligibility) आयटीआय कोर्सचा कालावधी ६ महिने, ९ महिने, १ वर्ष किंवा २ वर्षांचा असतो. आयटीआय कोर्स फीस ( Fess) आयटीआय कोर्सचा फीस ७ हजार प्रति वर्षापासून ३० हजार रुपयांपर्यंत प्रतिवर्ष असेल. सरकारी कॉलेजमध्ये फीस कमी असते. प्रमुख महाविद्यालय (ITI Colleges) गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट (महिला) रायबरेली गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल प्रशिक्षण इंस्टीट्यूट तिरुचिंदूर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, मांडवी, सूरत (गव्हर्नमेंट ) गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट (व्हिमांडस), मदुरै गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, पुरुलिया आयटीआय पास असणाऱ्यांना नोकरी आयटीआय उमेदवारांना रेल्वे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, अर्डिनेंस फॅक्ट्रीज, एनटीपीसी, भेल, पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, दूरसंचार, आयल अँड नेच्यूरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड, इंडियन आर्मी आणि सीआरपीएफ कंपनी पॅरा मिलिट्री फोर्समध्ये नोकरी मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zS8jUE
via nmkadda

0 Response to "Career In ITI:असा करा आयटीआय कोर्स, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel