CBSE 12std Exam Cancelled: उदय सामंत यांनी करुन दिली 'ती' आठवण Rojgar News

CBSE 12std Exam Cancelled: उदय सामंत यांनी करुन दिली 'ती' आठवण Rojgar News

Reaction on CBSCE Board Exam Cancelled :करोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने बारावीच्या करण्याच्या निर्णय घेतला. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री (higher and technical education minister Uday Samant) यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून घेतल्या गेलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. तसेच मागच्या वर्षी पदवी परीक्षा रद्द केल्यानंतर या निर्णयाला विरोध करण्यात आला होता याची आठवण देखील त्यांनी यावेळी करुन दिली. गेल्यावर्षी वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील पदवी परीक्षा रद्द ( Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला काहींनी विरोध दर्शविला होता. पदवी परीक्षा व्हायलाच हवी असा आग्रह धरण्यात आला. दरम्यान, काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द (CBSE Board 12th Exam Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पण हीच परिस्थिती असताना पदवी परीक्षा रद्द होण्याला विरोध झाला हे उदय सामंत यांनी निदर्शनास आणून दिले. आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या तेव्हा जोरदार विरोध आणि आता केंद्र सरकारने बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या तर स्वागत करण्यात येत आहे. असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. केंद्र सरकारने बारावी सीबीएसई विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द केल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे देखील ते पुढे म्हणाले. उदय सामंत यांच्या या सूचक ट्विटनंतर शिक्षण विभागातही राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना पाहायला मिळतोय.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34FsF5m
via nmkadda

0 Response to "CBSE 12std Exam Cancelled: उदय सामंत यांनी करुन दिली 'ती' आठवण Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel