CBSE 12std Exam चे वाद मिटवण्यासाठी समिती नेमणार, जाणून घ्या परीक्षेची तारीख Rojgar News

CBSE 12std Exam चे वाद मिटवण्यासाठी समिती नेमणार, जाणून घ्या परीक्षेची तारीख Rojgar News

12th Class :बारावीसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन ()ने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)याचिका दाखल केली. त्यानुसार परीक्षेच्या निकालाची घोषणा ३१ जुलैपर्यंत होईल. तसेच निकालासंदर्भात विवाद एका समितीकडे पाठवले जातील असे सीबीएईने सुप्रीम कोर्टात सांगितले. पर्यायी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा असेल. जर स्थिती अनुकूल असेल तर ही परीक्षा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान होऊ शकेल. वैकल्पिक परीक्षेत मिळवलेल्या गुणांना अंतिम मानले जाईल. पण बारावीच्या बोर्ड परीक्षा (12th Board Exams 2021) प्रकरणी सुप्रीम कोर्ट preme Court) ने सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ला सांगितले की, आम्ही तुमच्या स्किमवर तात्पुरती सहमती दर्शवली आहे. पण काही याचिका बोर्ड परीक्षा रद्द करण्यास आव्हान देतायत. त्यामुळे या याचिकेंचे म्हणणे ऐकून घेणे देखील महत्वाचे आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना डबल मास्क घालून परीक्षा देण्याची परवानगी मिळावी अशी याचिका यूपी पॅरेंट्स असोसिएशनतर्फे दाखल करण्यात आली. त्यावेळी ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यावरच न्यायालय सुनावणी करणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आता कोणत्या नव्या याचिकेवर सुनावणी होणार नाही. कोणतीही नवी याचिका स्वीकारु नये असे रजिस्ट्रीला सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालय मंगळवार २२ जूनला यावर सुनावणी करणार आहे. सीबीएसई योजना आणि विद्यार्थ्यांकडून दाखल झालेल्या फिजिकल परिक्षेच्या याचिकेवर बारकाईने अभ्यास करावा असे सुप्रीम कोर्टाने सीबीएसईला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २१ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सीबीएसई आणि सीआयसीएसई या केंद्रीय बोर्डांच्या बारावीच्या रद्द परीक्षांच्या मूल्यांकनाच्या निकषांवर सुनावणी घेतली. सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाद्वारे सीबीएसई आणि सीआईएससीई इव्हॅल्युएशन क्रायटेरिया वर अंतिम निर्णय देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यापूर्वीची सुनावणी १७ जून २०२१ रोजी झाली होती. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने सोमवारी सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षांवर देखील सुनावणी घेतली. ११५२ विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीएसई बोर्ड नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई आणि इतर शिक्षण मंडळाद्वारे घेतलेले मूल्यांकन पद्धतीनुसार बारावीच्या खासगी / कम्पार्टमेंट / रिपीटर्स विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वेळेत जाहीर करावे, अशी मागणी याचिकार्त्यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xwJEmC
via nmkadda

0 Response to "CBSE 12std Exam चे वाद मिटवण्यासाठी समिती नेमणार, जाणून घ्या परीक्षेची तारीख Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel