Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ जून, २०२१, जून ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-06-07T11:47:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 12th Assessment 2021 :असेसमेंटवर सीबीएसईचे निर्देश, शाळांना मिळाली 'ही' सवलत Rojgar News

Advertisement
CBSE xii Result Update:केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)ने शाळेतील असेसमेंट्स, प्रोजेक्ट्स आणि प्रॅक्टिकल्सच्या संबंधात निर्देश दिले आहेत. आता विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यासाठी ११ जून ही अंतिम तारीख नसेल. सोबतच असेसमेंटमध्ये देखील सवलत देण्यात आली आहे. इंटरनल असेसमेंट्स आणि प्रॅक्टिकल्ससाठी असलेल्या गाईडलाईन्स जाणून घ्या. शाळेची वेबसाइट cbse.nic.in वर क्लिक करुन २८ जून २०२१ पर्यंत बारावी विद्यार्थ्यांचे गुण अपलोड केले जाऊ शकतात. ज्या विषयांचे इंटरनल , प्रॅक्टिकल किवा प्रोजेक्ट/वायवा झाली नाहीय, त्यांच्या परीक्षा ऑनलाईनमाध्यमातून २८ जूनच्या आधी होऊ शकतात. बाहेरचे परीक्षक नियुक्त नसतील त्या विषयांचे अंतर्गत शिक्षकअसेसमेंट घेऊ शकतात. ही असेसमेंट सीबीएसई नियमांच्या आधारे ऑनलाईन होणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्टसाठी सीबीएसईद्वारे जिथे बाहेरचे परीक्षक नियुक्त होतील तिथे परीक्षांची तारीख ते ठरवतील. हे करताना इंटर्नल एग्झामिनर्ससोबत संपर्क साधला जाईल. विद्यार्थ्यांचा वायवा ऑनलाईन माध्यमातून होईल. वायवाच्या वेळी इंटरनल एग्झामिनर्स प्रत्येक विद्यार्थ्याचा ऑन स्क्रीन फोटो घेऊन ठेवणार. या फोटोमध्ये इंटर्नल, एक्सटर्नल एक्झामिनर आणि विद्यार्थी दोघेही दिसायला हवेत. २८ जूननंतर अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. शाळांनी याच वेळेत असेसमेंट पूर्ण करुन मार्क्स अपलोड करावे असे सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w1palA
via nmkadda