CBSE Compartment Exam:सीबीएसई फॉर्मुला रद्द करण्याची मागणी, ११५२ विद्यार्थ्यांची कोर्टात धाव Rojgar News

CBSE Compartment Exam:सीबीएसई फॉर्मुला रद्द करण्याची मागणी, ११५२ विद्यार्थ्यांची कोर्टात धाव Rojgar News

Compartment Exam:सर्वोच्च न्यायालयाने बारावी बोर्ड परीक्षेसाठी सीबीएसईच्या ज्या फॉर्मुल्यास हिरवा कंदील दाखविला होता त्याला काही विद्यार्थ्यांनी आव्हान दिले आहे. देशातील दहावी आणि बारावीच्या ११५२ विद्यार्थ्यांनी बारावीच्या कम्पार्टमेंट / प्रायवेट / रिपीटर्स परीक्षा (Compartment/Private/Repeat examination)रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. सीबीएसईची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर यासंदर्भात माहिती मिळू शकते. सीबीएसई बोर्ड नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई आणि इतर शिक्षण मंडळाद्वारे घेतलेले मूल्यांकन पद्धतीनुसार बारावीच्या खासगी / कम्पार्टमेंट / रिपीटर्स विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वेळेत जाहीर करावे, अशी मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. एडव्हॉकेट मानव जेटली आणि एडव्हॉकेट अभिषेक चौधरींच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यानुसार सीबीएसई बोर्डच्या दहावीच्या खासगी / कम्पार्टमेंट / रिपीटर्सच्या परीक्षा फॉर्मूलावर वेगाने निर्णय घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. ११५२ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत यासंदर्भात काही सूचना देखील केल्या आहेत. बारावीं सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ च्या सर्व खासगी / कम्पार्टमेंट/ रिपीटर्स / उमेदवारांचे आई-वडील आणि कुटुंबातील सदस्य, शिक्षक वर्ग आणि सर्व हितचिंतकांची सुरक्षा, आरोग्याची काळजी घेऊन सीबीएसईने नोटिफिकेशन रद्द केले, असे याचिकाकर्त्याने न्यायालयात म्हटले. सुप्रीम कोर्टाने ३ जूनला सीबीएसईला बारावीं परीक्षेबाबत योजना बनवून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. बोर्डाने १७ जूनला आपला फॉर्मुला कोर्टाला दिला. जो कोर्टाने मंजूर करुन आपल्या रेकॉर्डवर घेतला. पण यामध्ये अनेक विभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेत उदासिनता असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे संविधानातील समानतेचा अधिकार कलम १४ चे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी मध्ये बोर्ड नोटिसनुसार कंपार्टमेंट, रिपिटिव्ह, प्रायवेट, करस्पॉंडेंट कोर्स इत्यादी परीक्षार्थींसाठी प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, इंटरनल असेसमेंट या वेगळ्या देण्याऐवजी रेग्युलर विद्यार्थ्यांसोबतच घेतले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या तक्रारी देखील कोर्टात सांगितल्या जाव्यात अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. दरम्यान, करोना प्रादुर्भावामुळे दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. याआधी सीबीएसईने रिझल्टसाठी शाळेमध्ये फॉर्मेट पाठवला होता. या फॉर्मेटनुसार शाळेत प्रोजेक्ट वर्क, असाइनमेंट अशी माहिती मागवली होती. याआधारे फायनल रिझल्टची तयारी केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gHvt8W
via nmkadda

0 Response to "CBSE Compartment Exam:सीबीएसई फॉर्मुला रद्द करण्याची मागणी, ११५२ विद्यार्थ्यांची कोर्टात धाव Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel