Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ जून, २०२१, जून २५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-25T09:47:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE Syllabus 2021-22: विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी Rojgar News

Advertisement
२०२१-२२ : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर झाल्यानंतर २०२१-२२ या वर्षात देखील दरवर्षीचा अभ्यासक्रम शक्य नाही. देशभरातील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये सध्या अभ्यासक्रम बंद आहे किंवा ऑनलाईन माध्यमातून शिकवला जातोय. गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विविध इयत्तांमधील अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी केला होता. पण यावर्षी सीबीएसईने विविध इयत्ता आणि विशेषत: सेकेंडरी आणि सिनियर सेकेंडरी इयत्तांच्या दरवर्षीच्या अभ्यासक्रमात कोणता बदल केला नाही. किंवा त्यासंदर्भात कोणती घोषणा केली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थी सोशल मीडियात अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी करत आहेत. तर २०२२ ची बोर्ड परीक्षा पाहता यावर्षी अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सीबीएसईच्या अधिकाऱ्याने सांगितले. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्डाद्वारे गेल्या वर्षी जे विषय वगळले होते ते यावर्षी २०२१-२२ मध्ये पुन्हा जोडले आहेत. सीबीएसई बोर्डाद्वारे ठरविल्या गेलेल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वर्ष २०२१-२२ च्या अभ्यासक्रमासंदर्भात अधिकृत माहिती आणि महत्वाची अपडेट विद्यार्थ्यांना cbse.gov.in वेबसाईटवर मिळेल. सीबीएसईच्या वेबसाइटवरील सिलेबस सेक्शनमध्ये सध्या वर्ष २०२०-२१ साठी नववी,दहावी, अकारावी आणि बारावी अभ्यासक्रम उपलब्ध केला गेला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SqRtvf
via nmkadda