Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २४ जून, २०२१, जून २४, २०२१ WIB
Last Updated 2021-06-24T14:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावी CETचे स्वरुप जाहीर,किती गुणांची?कधी असेल परीक्षा ?सर्वकाही जाणून घ्या Rojgar News

Advertisement
format :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्याअकारावी सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) स्वरुप जाहीर झाले आहे. प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. ही राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice Objective Type Question)स्वरुपाचे असणार आहे. या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी २ तासांचा असणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर परीक्षेला बसायचे की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. फीस भरावी लागणार का ? दहावीची परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी सामाईक परीक्षेसाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही. असे असले तरी CBSE, ISCE आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. कधी होणार परीक्षा ? दहावीचा निकाल १५ जुलै दरम्यान लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर २ आठवड्यात म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरिस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अकरावी CET परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश कसा मिळेल ? सामाईक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर उरलेल्या जागा या सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्यांसाठी खुल्या असतील. त्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UBtJp1
via nmkadda