Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ जून, २०२१, जून ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-05T10:47:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Covid 19: AIIMS ने बदलली BSc Nursing प्रवेश परीक्षेची तारीख Rojgar News

Advertisement
Entrance Exam 2021: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (AIIMS) ने बीएससी नर्सिंग अॅडमिशन (BSc Nursing Admission) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. एम्स नवी दिल्ली ( Delhi) ने बीएससी नर्सिंग एन्ट्रन्स एक्झाम 2021 (BSc Nursing Exam 2021) स्थगित केली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एम्स व्यवस्थापनाने या संबंधी अधिकृत निवेदन जारी केले आहे. एम्स बीएससी नर्सिंग परीक्षा 2021 चे आयोजन 27 जून रोजी होणार होते. अॅडमिट कार्ड २ जून रोजी जारी होणार होते. पण करोना विषाणू महामारी परिस्थितीमुळे ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा एम्स ची वेबसाइट aiimsexams.ac.in वर काही दिवसांनंतर जारी केली जाणार आहे. एम्स द्वारे बीएससी नर्सिंग कोर्स (BSc Nursing Course) च्या एकूण ५७१ जागांवरील प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेद्वारे एम्सच्या दिल्ली, भोपाळ, जोधपूर, रायपूर, ऋषिकेश, पटना आणि भुवनेश्वर येथील कॅम्पसमध्ये अॅडमिशन प्रक्रिया होणार आहे. संस्थेने उमेदवारांना सांगितले आहे की परीक्षेसंबंधी कोणत्याही अद्ययावत माहितीसीठी त्यांनी एम्स एक्झाम (AIIMS Exams) च्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uUPlsI
via nmkadda