DFCCIL Recruitment 2021: रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमध्ये भरती Rojgar News

DFCCIL Recruitment 2021: रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमध्ये भरती Rojgar News

रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry Of Railways) अंतर्गत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड () मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी अद्याप संपलेली नाही. या भरती प्रक्रियेची मुदत संस्थेने वाढवली आहे. ऑनलाइन अर्जांसाठी आता २३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. डेडिकेटेड डीएफसीसीआयएल कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस नवी दिल्ली येथे आहे आणि त्यांची फिल्ड युनिट्स, मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, अंबाला इ. ठिकाणी आहेत. ज्युनिअर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्हच्या एकूण १,०७४ पदांची भरती सुरु आहे. पदांची माहिती ज्युनियर मॅनेजर (सिविल) - ३१ पदे ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशंस अँड बीडी) - ७७ पदे ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) - ३ पदे एक्झिक्युटिव (सिविल) - ७३ पदे एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - ४२ पदे एक्झिक्युटिव (सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन) - ८७ पदे एक्झिक्युटिव (ऑपरेशंस अँड बीडी) - २३७ पदे एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - ३ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - १३५ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन) - १४७ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशंस अँड बीडी) - २२५ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - १४ पदे एकूण पदे - १०४७ शैक्षणिक पात्रता पदांनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करून मिळेल. दहावी उत्तीर्ण ते आयटीआय करणारे तसेच संबंधित ट्रेडचा डिप्लोमा, पदवी, एमबीए किंवा पीजीडीएम आणि इंजिनीअरिंग अशी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. निवड पद्धती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी), कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट (फक्त एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स अँड बीडी पदांसाठी), कागदपत्रं पडताळणी, मुलाखत (फक्त ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी), मेडिकल टेस्ट (सर्व पदांसाठी). कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (ऑनलाइन मोड)साठी दोन तासाचा कालावधी असतो. एमसीक्यू प्रकारचे १२० प्रश्न इंग्रजी किंवा हिंदी भाषेत विचारले जातील. कम्प्युटर बेस्ड अॅसप्टिट्यूड टेस्ट फक्त एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स अँड बीडी) पदांसाठी घेतली जाईल. प्रश्नांचं स्वरूप जाणून घेण्यासाठी https://ift.tt/2SMzC1L वेबसाइटला भेट द्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3psO1wg
via nmkadda

0 Response to "DFCCIL Recruitment 2021: रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमध्ये भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel