Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ३० जून, २०२१, जून ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-06-30T13:47:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ESIC Mumbai Recruitment 2021: मुंबईत विविध पदांवर भरती, मुलाखतीने होणार निवड Rojgar News

Advertisement
Mumbai : कर्मचारी राज्य वीमा निगम ( Employees State Insurance Corporation, ESIC) मुंबईने विविध विभागांमध्ये सेंटर रेजिडेंटच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत एकूण २० पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2PLGipY वर जाऊन ऑनलाईन नोटिफिकेशन वाचून अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. १५ जुलै २०२१ ला मुलाखत होणार आहे. पूर्ण नोटिफिकेशन नीट वाचावे आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण यामध्ये काही गडबड जाणवल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे याची काळजी घ्यावी लागेल. नोटिफिकेशन जाहीर होण्याची तारीख- ३० जून २०२१ मुलाखतीची तारीख- १५ जुलै २०२१ रिक्त विभाग आणि पदांची संख्या अॅनेस्थिसिओलॉजी -१ जैव रसायन -१ कॅजुअल्टी -५ मेडिसिनलेअर आयसीयू -३ मायक्रोबायोलॉजी -१ नेत्र विज्ञान (नेत्र) -१ मेडिसिन (छाती) -१ रेडिओ डायग्नोसिस (रेडिओलॉजी) -३ सर्जरी -४ शैक्षणिक आर्हता कर्मचारी राज्य वीमा निगमच्या वतीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार सिनियर रेजिडेंटच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पीजी, एमडी, डीएनबीसोबत एमबीबीएस पदवी असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रामध्ये डिप्लोमा किंवा एमबीबीएमसहित २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १९ जून २०२१ पासून सुरु आहे. सिनियर रेजिडंटच्या पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. यासाठी दुसरा माळा, एमएस कार्यालय, ईएसआयएस रुग्णालय कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई -४००१०१ पत्ता देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qJ5hOA
via nmkadda