Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ जून, २०२१, जून ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-05T07:47:43Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Facebook India Tech Scholars Program : लॉ विद्यार्थ्यांसाठी इंडीया टेक स्कॉलर्स प्रोग्राम Rojgar News

Advertisement
Facebook Introduced : भारतातील कायद्याचे (Law) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडीयातर्फे () लॉच्या विद्यार्थ्यांसाठी () इंडीया टेक स्कॉलर्स प्रोग्राम (India Tech Scholars Program) होणार आहे. फेसबुक इंडीयाने यासंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. देशातील कायद्याचे शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य संस्थांमधील विद्यार्थी निवडून त्यांना तंत्रज्ञान कायद्याशी संबंधित विषयांवर संशोधन आणि मार्गदर्शन करणे हा यामागचा हेतू आहे. २०२०-२१ च्या पहिल्या सत्रासाठी निवडल्या गेलेल्या ८ विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातही यांचे मार्गदर्शन कायम राहणार आहे. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडीया युनिव्हर्सिटी बंगळुरु, WB नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरीडीक्शल सायन्स-कोलकाता, द नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी-दिल्ली आणि द नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी-जोधपूरमध्ये चौथ्या आणि पाचव्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. तंत्रज्ञान कायदा क्षेत्रात वेगाने बदलणारी परिस्थिती आणि देशातील कायदे पाहता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी भविष्यातील धोरणांवर आपले मत व्यक्त करु शकतील असे फेसबुक इंडीयातर्फे सांगण्यात आले आहे. भविष्यात अधिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम असेल असेही त्यांनी सांगितले आहे. एफआयटीएस प्रोग्राम २०२०-२१ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट आणि सोसायटी, द ऑब्सर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, द कॅरनेज इंडोन्मेंट फॉर इंटरनॅशन पीस इंडीया आणि सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटर या अग्रगण संस्था मार्गदर्शन करणार आहेत. तसेच फेसबुकतर्फे देखील अनुभवी आणि तज्ञांच्या समितीचे मार्गदर्शन या प्रोग्रामदरम्यान होणार आहे. शार्दूल अमरचंद मंगलदास आणि कंपनी याचे नॉलेज पार्टनर आहेत. २० जून ही यासंदर्भातील अर्जाची शेवटची तारीख आहे. एफटीआयएसचा हा प्रोग्राम ९ महिन्यांचा असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fS5drS
via nmkadda