FYJC CET Syllabus: प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता? जाणून घ्या... Rojgar News

FYJC CET Syllabus: प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता? जाणून घ्या... Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे CET Syllabus Update: अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम पुढील दोन दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असेही सूतोवाच शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. याबरोबरच अकरावी प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारित असली तरी परीक्षेसाठी विशेष अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांमध्ये तो जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रवेश परीक्षा शंभर गुणांची असेल, हे यापूर्वी शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पण कोणकोणत्या विषयांवर आधारित प्रश्न असतील, याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. परीक्षेला न बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? अकरावीची प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल, असे राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रवेश दिले जाणार आहेत. एखादा विद्यार्थी काही अपरिहार्य कारणांमुळे प्रवेश परीक्षा देऊ शकला नाही, तर त्याला प्रवेशासाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारने परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व महाविद्यालयांमध्ये राखीव जागा ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TcCkxS
via nmkadda

0 Response to "FYJC CET Syllabus: प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता? जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel