Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ जून, २०२१, जून २५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-25T07:47:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU Astrology Course: ज्योतिष शास्त्रात पदवी मिळवा, 'या' विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश Rojgar News

Advertisement
Astrology Course:इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिवर्सिटी ((Indira Gandhi National Open University, IGNOU) ने एस्ट्रॉलॉजी इन मास्टर प्रोग्राम कोर्स (Masters Programme In Astrology)लॉन्च केला आहे. इग्नूने या संबंधात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्योतिष शास्त्राच्या (Astrology Course) विविध शाखांबद्दल प्रॅक्टीकल शिक्षण देणे हा या कोर्सचा हेतू आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात. अभ्यासक्रमाची भाषा हिंदी असणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ignouadmission.samarth.edu.in वर जाऊन लॉग इन करु शकता. फीस किती ? IGNOU ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार MAJY अभ्यासक्रमाचे शुल्क १२,६०० रुपये आहे. दोन भागात ही फीस भरावी लागेल. याअंतर्गत पहिल्यावर्षी ६,३०० रुपये आणि नोंदणी शुल्क २०० रुपये भरावे लागेल. तर दुसऱ्या वर्षी ६,३०० रुपये भरावे लागतील. देशभरात वेगवेगळ्या राज्यांतील ५७ इग्नू केंद्रांवर हा अभ्यासक्रम असेल. याव्यतिरिक्त अलीकडेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिवर्सिटी (इग्नू) ने जुलै प्रवेशाची तारीख वाढविली आहे. याअंतर्गत इग्नूमध्ये विविध कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. जे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ इच्छितात ते विद्यापीठाची वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वरुन अर्ज करु शकतात. शेवटची तारीख निघून गेल्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी. याची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jcQMAE
via nmkadda