Indian Army Jobs: सैन्यात महिलांना संधी, 'या' शहरांमध्ये होणार सैन्य भरती रॅली Rojgar News

Indian Army Jobs: सैन्यात महिलांना संधी, 'या' शहरांमध्ये होणार सैन्य भरती रॅली Rojgar News

Recruitment Rally 2021 : भारतीय सैन्य (Indian Army)दलात महिला सैनिकांची आवश्यकता आहे. सैन्याच्या वुमन्स मिलिट्री पोलीस (Women Military Police) विंगमध्ये सोल्जर जनरल ड्यूटीच्या पदावर भरती केली जात आहे. इंडियन आर्मीतर्फे या रिक्त जागेसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत. देशाच्या मुलींसाठी सैन्यात दाखल होण्याची ही सुवर्णसंधी आहे. पदाचे नाव - सोल्जर जनरल ड्यूटी (वुमन्स मिलिट्री पोलीस) पदांची संख्या - १०० भारतीय सैन्याने आर्मी २०२१()चे आयोजन केले आहे. ही रॅली अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे आणि शिलॉंगमध्ये जाणार आहे. या रॅलीची तारीख, वेळ आणि स्थानाची माहिती उमेदवारांना दिली जाईल. पात्रता - सैन्याच्या पदांवरील भरतीसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ४५% गुण तसेच 10 वीस पास असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आपले वय १७ वर्षे ६ महिने २१ वर्षे असणे गरजेचे आहे. काही प्रकरणांमध्ये ३० वर्षांपर्यंत सवलत दिली जाईल. यासंदर्भात पुढे माहिती देण्यात आली आहे. शारीरिक पात्रता उमेदवाराची उंची १५२ सेमी असावी. नॉर्थ ईस्टच्या उमेदवारांना ४ सेमीची सूट दिली जाईल. म्हणजे त्यांच्यासाठी १४८ सेमी उंची असणे गरजेचे आहे. निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्टच्या आधारावर निवड केली जाईल. मेडिकली फिट असणाऱ्या उमेदवारांना कॉमन एंट्रंस टेस्ट (CEE)द्यावी लागेल. तुमच्याकडे एनसीसी प्रमाणपत्र (NCC Certificate)असेल तर तुम्हाला बोनस गुण अशाप्रकारे मिळतील. एनसीसी ए प्रमाणपत्र - ५ बोनस गुण एनसीसी बी प्रमाणपत्र - १० बोनस गुण एनसीसी सी सर्टिफिकेट्स - लेखी चाचणी होणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w7u4xL
via nmkadda

0 Response to "Indian Army Jobs: सैन्यात महिलांना संधी, 'या' शहरांमध्ये होणार सैन्य भरती रॅली Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel