TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Indian Armyमध्ये महिला मिलेट्री पोलिसात भरती, पात्रता निकष जाणून घ्या Rojgar News

Women Recruitment 2021: भारतीय सैन्याद्वारे सोल्जर जनरल ड्यूटी (वुमेन मिलिट्री पोलीस) भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सैन्याने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार अंबला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे आणि शिलॉंग येथे आयोजित केल्या जाणाऱ्या सैन्य भरतीच्या माध्यमातून सोल्जर (जनरल ड्यूटी-वुमन मिलेट्री पोलीस) पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्य पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध असलेला अर्ज भरु शकतात. २० जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्रता जाणून घ्या भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार वुमन मिलिट्री पोलीसच्या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ४५ टक्क्यांसह दहावी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. दहावीच्या सर्व विषयात ३३ टक्के गुण असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय १७.५ वर्षापेक्षा कमी आणि २१ वर्षांहून अधिक असू नये. म्हणजे उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० आधी आणि १ एप्रिल २००४ च्यानंतरचा नसावा. उमेदवाराची उंची किमान १५२ सेमी आणि वजन हे उंचीप्रमाणे असावे. जाणून घ्या प्रक्रिया सोल्जर जनरल ड्यूटी (वूमन मिलिट्री पोलीस) उमेदवारांची निवड फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) आणि कॉमन एंट्रस टेस्ट (CEE)च्या माध्यमातून लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. पीएफटीचे आयोजन रॅलीची तारीख किंवा जागेवर केले जाईल. यात पास झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. अंतिम यादी मेरिटच्या आधारे बनवली जाईल. यानुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xcRqCs
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या