Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २८ जून, २०२१, जून २८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-28T07:47:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Indian Coast Guard Bharti: तटरक्षक दलात भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी Rojgar News

Advertisement
Indian Coast Guard Recruitment 2021 Notification: इंडियन कोस्ट गार्ड (Indian Coast Guard किंवा ICG) म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने सहायक कमांडंट -01/2022 बॅचच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. सरकारी नोकरीच्या (Govt )शोधात असणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी ही भरती म्हणजे सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ICG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. joinindiancoastguard.gov.in ही ICG ची अधिकृत वेबसाइट आहे. इंडियन प्रक्रिया ४ जुलै २०२१ पासून सुरू होणार आहे आणि १४ जुलै पर्यंत ऑफिशियस पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ICG Job 2021 नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्व सर्व जरुरी माहिती अवश्य वाचा. भारतीय तटरक्षक दल भरती २०२१ रिक्त पदांची माहिती (ICG Vacancy 2021 Details) जनरल ड्युटी (GD) - ४० पदे टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) ऑफिसर - १० पदे रिक्त जागा केवळ पुरुष उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. अर्जांसाठी पात्रता जनरल ड्युटी (जीडी): कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी आवश्यक. या व्यतिरिक्त बारावीत (इंटरमीडिएट) मॅथ्स आणि फिजिक्स दोन्ही विषय मिळून एकूण किमान ६० टक्के गुण आवश्यक. टेक्निकल पोस्टसाठी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी आवश्यक. या व्यतिरिक्त बारावीत (इंटरमीडिएट) मॅथ्स आणि फिजिक्स दोन्ही विषय मिळून एकूण किमान ६० टक्के गुण आवश्यक. वयोमर्यादा दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २४ वर्षे (१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान जन्म) असावे. एससी/एसटी साठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सवलत मिळेल. निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल. उमेदवारांना प्राथमिक निवडीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. यात मेंटल अॅबिलिटी टेस्ट किंवा कॉग्निटिव अॅप्टिट्यूड टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन अँड डिस्कशन टेस्ट (पीपी अँड डीटी) या चाचण्यांचा समावेश असेल. पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवडीचा टप्पा ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत राबवला जाईल. अंतिम निवड सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूद्वारे होईल. या अंतिम टप्प्यात पात्र ठरल्यावर मेरिट लिस्टच्या आधारे निवड होईल. शेवटी उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dnLFtE
via nmkadda