ISC 12th result 2021:आयएससी बारावीच्या विद्यार्थ्यांचे असे होऊ शकते मूल्यांकन Rojgar News

ISC 12th result 2021:आयएससी बारावीच्या विद्यार्थ्यांचे असे होऊ शकते मूल्यांकन Rojgar News

isce 12th result 2021: सीबीएसईने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता काउन्सिल फॉर द इंडीयन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन ()ने देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोर्डातर्फे विद्यार्थ्यांची लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या काही वेळातच काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन (CISCE) ने देखील घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या बोर्डाने दहावीची परीक्षा देखील रद्द केली होती. आयएससीतर्फे लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाचे निकष जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ते परीक्षा देऊ शकतात हे देखील बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आले. ISCE आणि CBSE ने बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ९वी, १०वी आणि ११ वी ची माहिती जमा करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. ISCE ने विद्यार्थ्यांचे संपूर्ण गुण पाठवण्यासाठी शाळांना ७ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. बारावीची अंतर्गत परीक्षेतील गुण आणि मागील तीन वर्षांच्या गुणवत्तेवर मूल्यांकन केले जाऊ शकते. यासंदर्भात अंतिम निर्णय येणार आहे. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा (CBSE Board 12th Std Exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. गेले अनेक दिवस यावर तोडगा निघत नसल्याने विद्यार्थी चिंतेत होते. या निर्णयामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले. देशात उद्भवलेल्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी यापूर्वी २१ मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती ज्यात मंत्री व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती.ज्यामध्ये राज्यांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. बैठकीत सीबीएसई परीक्षा आयोजित करण्याच्या विविध पर्यायांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या अभिप्रायांवर चर्चा करण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i5PlUe
via nmkadda

0 Response to "ISC 12th result 2021:आयएससी बारावीच्या विद्यार्थ्यांचे असे होऊ शकते मूल्यांकन Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel