बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता JEE, NEET परीक्षांचे काय? Rojgar News

बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता JEE, NEET परीक्षांचे काय? Rojgar News

JEE Mains, NEET Exam Update: केंद्र सरकारने सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. बहुतांश राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता वेळ आहे देशातील सर्वात मोठ्या इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांसंबंधीच्या निर्णयाची. म्हणजेच जेईई मेन (JEE Main 2021) आणि नीट 2021 () परीक्षांबाबतच्या निर्णयाची आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. बारावी बोर्ड परीक्षांनंतर केंद्र सरकारचे लक्षही या मोठ्या प्रवेश परीक्षांकडे आहे. शिक्षण मंत्रायलयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार नीट यूजी 2021 परीक्षा (NEET UG Exam) परीक्षा पुन्हा एकदा स्थगित केली जाऊ शकते. तसेच जेईई मेन परीक्षांच्या नव्या तारखांवर निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. जेईई मेन परीक्षेच्या उर्वरित दोन सत्रांची (JEE Main April and May) परीक्षा आणि नीट परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्रालय आढावा बैठका घेत आहे. करोना विषाणू महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार उपलब्ध पर्यायांचा विचार करत या परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या जातील. नीट परीक्षा तूर्त नियोजित वेळेनुसार १ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा या दिवशी घ्यावी की नाही याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. सरकारकडून निर्णय आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नीट 2021 च्या वेबसाइट (NEET 2021 website) वर म्हणजेच ntaneet.nic.in येथे नीट 2021 अॅप्लिकेशन फॉर्म (NEET 2021 application form) जारी केला जाईल. नीट परीक्षा ऑफलाइन (पेन-पेपर) मोड वर होते. मागील वर्षी करोना काळातही १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राज्यातील बारावीची परीक्षा रद्ददरम्यान, करोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी पाठोपाठ बारावी परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ यांना प्राधान्य देत निर्णय घेतल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या निर्णयानंतर राज्यातही अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने राज्य मंडळाच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वागत केले तर, काही विद्यार्थी, पालकांच्या मनात मूल्यांकन, करिअरमध्ये पुढे याच काय परिणाम होतील का याबाबत चिंता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fOQFcB
via nmkadda

0 Response to "बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता JEE, NEET परीक्षांचे काय? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel