Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ जून, २०२१, जून २३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-23T08:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MBA MMS CET 2021 साठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

Advertisement
महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षामार्फत एमबीए आणि एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या सीईटीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जुलै २०२१ पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या सीईटी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी राज्यातील विविध विद्यापीठे आणि शासकीय महाविद्यालयांमधील एमबीए एमएमएस अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. १७ जुलै २०२१ रोजी रात्री ११.१५ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेसंबंधीची माहिती उपलब्ध आहे. MAH MBA/MMS CET 2021 साठी अर्ज कसा कराल? - एमबीए प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल वर जा. - होमपेजवरील MAH MBA/MMS CET 2021 लिंकवर क्लिक करा. - विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. - अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. - अॅप्लिकेशन शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि सबमिट करा. - MAH MBA/MMS CET 2021अॅप्लिकेशन फॉर्मचे प्रिंटआऊट घेऊन ठेवा. दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही या सीईटीसंदर्भातील ट्विट केले आहे. ते लिहितात, 'शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ करिता एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी महा - एमबीए/एमएमएस - सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया आज दिनांक २२/०६/२०२१ पासून दिनांक १७/०७/२०२१ पर्यंत सुरू राहील. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://ift.tt/3vMLhvb या लिंकवर भेट द्यावी. उर्वरित पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gPbpl2
via nmkadda