medical examination:आधी RTPCR चाचणी नंतर परीक्षा ; वैद्यकीय परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय Rojgar News

medical examination:आधी RTPCR चाचणी नंतर परीक्षा ; वैद्यकीय परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यभरात दहा जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या (Maharashtra Health Sciences University)वैद्यकीय परीक्षेला (Medical Exam) बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आता आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच हा निर्णय दिला असून, चाचणी निगेटिव्ह आली तरच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत, तर काही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विद्यापिठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२० अंतिमपूर्व वर्षांच्या परीक्षाही पुढे ढकलून दहा जूनपासून आयोजित करण्यात आल्या आहेत. आरोग्यशास्त्राच्या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसल्यामुळे त्या प्रत्यक्षरीत्या परीक्षा केंद्रांवर घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना करोनाचा धोका असून, त्या परीक्षा केंद्रांवर न घेता ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत हर्ड फाऊंडेशन आणि नितेश तंत्रपाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत न्यायालयाने या परीक्षा प्रत्यक्षरित्या परीक्षा केंद्रांवर घेण्याचाच निर्णय दिला आहे. परंतु करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करून, विद्यार्थ्यांना त्याचा अहवाल परीक्षा केंद्रावर जमा करावा लागणार आहे. चाचणीचा निकाल निगेटीव्ह असलेल्यांनाच ही परीक्षा देता येणार असल्याचे, न्यायलयाने स्पष्ट केले आहे. आरटीपीसीआर तातडीने करणे शक्य नसल्यास दहा जूनपर्यंत विद्यार्थ्यांना रॅपिड अँटिजेन टेस्ट करून परीक्षेला बसता येणार आहे, परंतु त्यानंतर १५ जूपर्यंत या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआरचा रीपोर्ट जमा करावा लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34TrKyk
via nmkadda

0 Response to "medical examination:आधी RTPCR चाचणी नंतर परीक्षा ; वैद्यकीय परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel