Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ जून, २०२१, जून ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-05T05:47:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIOS 12th Exam 2021 cancelled: NIOS बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द; 'असा' तयार होणार निकाल Rojgar News

Advertisement
NIOS Class 12 Exam 2021 cancelled: सीबीएसईपाठोपाठ आता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने (NIOS)बारावीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. करोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता हा निर्णय घेण्यात आला. पर्यायी पद्धतीद्वारे (Objective Criteria for evaluating)लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सिनिअर सेकंडरी कोर्सेसच्या प्रत्यक्ष आणि लेखी अशा दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली. लवकरच पर्यायी प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. याचा फायदा साधारण १.७५ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. याआधी NIOS ने मेमध्ये दहावींच्या थेअरी आणि प्रॅक्टीकल अशा दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान जे विद्यार्थी या पद्धतीवर समाधानी नाहीत त्यांना करोना परिस्थिती सुधारल्यानंतर परीक्षेचा पर्याय उपलब्ध असेल, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएसईच्या निकालांसाठी १२ सदस्यांची समिती सीबीएसई (CBSE)ची परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यांकन पद्धतीची लवकरच घोषणा होण्याची शक्यत आहे. सीबीएसई बारावी परीक्षेच्या मुल्यांकनासाठी १२ सदस्यांच्या समिती स्थापन करण्यात आली आहे. दहा दिवसांमध्ये ही समिती निर्णय समोर ठेवणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SXPhvk
via nmkadda