Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २ जून, २०२१, जून ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-06-02T05:47:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; NWDA मध्ये भरती Rojgar News

Advertisement
प्रा. संजय मोरे आपण नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी यामधील भरतीबाबत माहिती घेणार आहोत. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी (NWDA), नवी दिल्ली. एनडब्ल्यूडीएचं मुख्यालय आणि देशभरातील विविध फिल्ड ऑफिसेसकरिता पुढील ५२ पदांची भरती होणार आहे. ० लोवर डिव्हीजन क्लर्क- २३ पदं (अजा-६, अज-३, इमाव-४, इडब्ल्यूएस-२, खुला-८) पात्रता- बारावी उत्तीर्ण आणि कम्प्युटरवर टायपिंग स्पीड इंग्लिश ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. इष्ट पात्रता- कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम्स, एमएस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट आणि इंटरनेटचं ज्ञान. ० स्टेनोग्राफर ग्रेड- खख- ५ पदं (अज-१, इडब्ल्यूएस-१, खुला-३) पात्रता- बारावी उत्तीर्ण आणि कम्प्युटरवर स्किल (शॉर्ट हँड) टेस्ट ८० श.प्र.मि. ० अप्पर डिव्हीजन क्लर्क- १२ पदं (अजा-१, इमाव-३, इडब्ल्यूएस-१, खुला-७) पात्रता- पदवी उत्तीर्ण इष्ट पात्रता- कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम्स, एमएस वर्ड, ऑफिस, एक्सेल, पॉवरपॉइंट आणि इंटरनेटचं ज्ञान. ० ज्युनिअर अकाऊंट्स ऑफिसर- ५ पदं (इमाव-१, खुला प्रवर्ग-४) पात्रता- कॉमर्स विषयातील पदवी उत्तीर्ण आणि गव्हर्नमेंट ऑफिस/ पीएसयू/ ऑटोनॉमस बॉडी/ स्टॅट्युटरी बॉडीमधील कॅश आणि अकाऊंट्सच्या कामाचा तीन वर्षांचा अनुभव. इष्ट पात्रता- सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएस पदवीधारकांना प्राधान्य. ० हिंदी ट्रान्सलेटर- १ पद (खुला प्रवर्ग) पात्रता- एमए (हिंदी किंवा इंग्रजी). पदवी स्तरावर इंग्रजी किंवा हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा इंग्रजी/ हिंदी माध्यमातून पदवी घेतली असावी आणि हिंदीमधून इंग्रजी किंवा इंग्रजीमधून हिंदी भाषांतर करण्याचा सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा भाषांतर करण्याचा गव्हर्नमेंट किंवा पीएसयूचा दोन वर्षांचा अनुभव. ० ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हील)- १६ पदं (अजा-३, इमाव-१, इडब्ल्यूएस-१, ओपन-११) पात्रता- सिव्हील इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा उत्तीर्ण इष्ट पात्रता- सिव्हील इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण वयोमर्यादा - पद क्र. १ ते ३ आणि ६साठी १८ ते २७ वर्षं, पद क्र. ४ व ५साठी २१ ते ३० वर्षं (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव- ३ वर्षं, अजा/अज- ५ वर्षं, दिव्यांग- १०/१३/१५ वर्षं) ४ टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत. निवड पद्धती सर्व पदांसाठी संगणकावर आधारित ऑनलाइन चाचणी घेतली जाइल. स्टेनोग्राफर आणि एल्डीसी पदांसाठी ऑनलाइन चाचणी घेतल्यानंतर स्किल टेस्ट (शॉर्टहँड/टायपिंग) घेतली जाईल. ऑनलाइन टेस्टची तारीख उमेदवारांना ई-मेलने कॉल लेटरद्वारे कळवली जाईल.) एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचे असल्यास वेगवेगळे अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज www.nwda.gov.in या संकेतस्थळावर २५ जून, २०२१पर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3caopyR
via nmkadda