Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ जून, २०२१, जून २५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-25T09:47:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Reliance Vacancy: रिलायन्स रिटेलमध्ये लाखो तरुणांना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
Reliance AGM:रिलायन्स रिटेलमध्ये येणाऱ्या तीन वर्षात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या रिटेल बिझनेसमध्ये येणाऱ्या तीन ते पाच वर्षांमध्ये तिप्पट वाढ होणार आहे. यासोबतच रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठी घोषणा केली. तीन वर्षात दहा लाख नवे रोजगार तयार करेल. तसेच अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करेल असेही ते म्हणाले. ६५ हजार नव्या नोकऱ्या करोना प्रादुर्भावाच्या काळात रिलायन्स रिटेलने उत्तम प्रदर्शन केले आहे. कंपनीने आपली १५०० स्टोर्सची वाढवली आहेत. करोना काळात ६५ हजार नव्या नोकऱ्या देण्यात आल्या. २ लाख कर्मचारी संख्या असलेले रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी संस्था ठरल्याचे ते म्हणाले. रिलायन्स रिटेल खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या तीने ते पाच वर्षात कंपनी कमीत कमी तिप्पट वाढेल याबद्दल मला विश्वास आहे. करोना काळ खूप आव्हानात्मक होता तरी २०२०-२१ या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलने १,५३,८१८ कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wVlceJ
via nmkadda