Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १ जून, २०२१, जून ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-06-01T08:47:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावीपेक्षा बारावीची परीक्षा महत्त्वाची; राज्य सरकारचे कोर्टाच प्रतिज्ञापत्र Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांची एकमेकांशी तुलना केली जाऊ शकत नाही. दहावीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या करिअरचे भवितव्य हे बारावीच्या परीक्षेवर अधिक अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पुढील करिअरचा निर्णय हा दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षेच्या आधारावर घेतला जातो. त्यामुळे दहावीपेक्षा बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे,' असा युक्तिवाद राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या सविस्तर प्रतिज्ञापत्रात मांडला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या (एसएससी बोर्ड) बारावीच्या परीक्षेचा निर्णय हा केंद्रीय स्तरावरील अंतिम निर्णयावर अवलंबून असला, तरी दहावीचा निर्णय दहावीचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य सर्व घटकांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच घेतल्याचेही सरकारने म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने म्हटले आहे, की 'दहावी व बारावीच्या सर्व पैलूंचा विचार करता दोन्ही परीक्षांची तुलना होऊ शकत नाही. मात्र, परीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय दोन्हींसाठी एकसारखाच असायला हवा, असे म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या भवितव्याच्या दृष्टीने दहावीच्या तुलनेत बारावीचा टप्पा अधिक महत्त्वाचा असतो. शिवाय दहावीपेक्षा बारावीचे विद्यार्थी हे अधिक परिपक्व, स्वतंत्र, सामाजिकदृष्ट्या सजग आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त असतात. बारावीची परीक्षा रद्द केली नाही, म्हणून दहावीची रद्द करता येणार नाही, असे म्हटले जाऊ शकत नाही. दहावीच्या परीक्षेसाठी २०२०-२१मध्ये सुमारे १६ लाख विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला नऊ ते दहा वेळा उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी परीक्षा केंद्रावर जावे लागते. याशिवाय केंद्रांवर जवळपास चार लाख कर्मचारी वर्ग तैनात करावा लागेल. आणि पोलिस, सुरक्षा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचीही व्यवस्था करावी लागेल. यात करोनाच्या संसर्गाचा धोका आहे. सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.' दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेचा विषय सुनावणीसाठी घेतला आहे. त्यानुसार, मंगळवारी खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे. प्रतिज्ञापत्रातील आणखी महत्त्वाचे मुद्दे -करोनाच्या दुसऱ्या लाटेत पाच लाख ७२ हजार ३७१ लहान मुलांना करोनाची लागण आणि त्यापैकी चार लाख ६६० हे ११ ते २० वयोगटातील. -जुलै-ऑगस्ट २०२१दरम्यान तिसरी लाट येण्याचा तज्ज्ञांकडून अंदाज - राज्यातील आरोग्य सेवेवर खूप ताण. -केंद्रीय पातळीवर निर्णय झाल्यानंतर राज्य सरकारही योग्य तो निर्णय घेईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i4xGMv
via nmkadda